बेअरस्टो व जेसन रॉयच्या फटकेबाजीनंतर इंग्लंडचे भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण, भारताची मालिकेत १-० ने आघाडी

कसोटी मालिकेनंतर टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरला होता. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडुन अष्टपैलु कृणाल पंड्या व जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णा आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळत होते.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्याने भारताला सलामीवीरांकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीमुळे गोलदाजीची धुरा मार्क वुड व आदिल राशिदवर होती. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवनने सावध पवित्रा घेतला होता.दोघेही मैदानावर स्थिरावले असे दिसत असतानाच बाहेर जाणाऱ्या चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात रोहित (२८) बाद झाला.रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहलीने धावसंख्येला वेग दिला.टी-२० सामन्यांत अपयशी ठरलेला शिखर धवन अर्धशतक झळकवल्यानंतर आपल्या नेहमीच्या लयीत आला होता.मार्क वुडला मोठा फटका फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली (५६) मोईन अलीकडे झेल देऊन परतला. विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरही माघारी परतला होता. ३२ षटकांत १ बाद १६९ वरुन भारतीय संघाची अवस्था ३ बाद १८७ झाली होती.

झटपट दोन गडी बाद झाल्याने संघाची जिम्मेदारी शिखर धवनवर होती. शिखर धवन आपल्या शतकाकडे आगेकुच करत होता तर दुसरीकडे होता टी-२० मालिकेत पुर्णपणे अपयशी ठरलेला के एल राहुल.शिखर धवन शतक झळकवणार असे दिसत असतानाच शिखर ९८ धावांवर बाद झाला.शिखर पाठोपाठ हार्दिक पंड्या सुद्धा माघारी परतला होता. एकवेळ भारतीय संघ चांगल्या स्थितीत दिसत असतानाच भारताने ३६ धावांत ४ गडी गमावले होते.भारतीय संघ अडचणीत सापडला होता पण आपला पहिला वहिला सामना खेळणारा कृणाल पंड्याने शानदार फटके खेळण्यास सुरुवात केली होती आणि कृणालची फटकेबाजी पाहता सुरुवातीला सावध खेळत असणारा राहुलही लयीत येत होता.भारतीय संघ २६०-२७० पर्यंत पोहचेल असेच दिसत होते पण कृणाल-राहुलच्या जोडीने ६१ चेंडूत ११२ धावा जोडत संघाला ३१७ धावांपर्यत नेऊन ठेवले होते.भारताकडुन धवनने ९८,राहुलने नाबाद ६२, कृणाल पंड्याने नाबाद ५८ व विराट कोहलीने ५६ धावा केल्या होत्या तर इंग्लंडकडुन बेन स्टोक्सने ३ तर मार्क वुडने २ गडी बाद केले होते.

३१८ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी इंग्लंडला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती.सुरुवातीची काही षटके सावध खेळुन काढल्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो व जेसन रॉयने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला होता.त्यात बेअरस्टोने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत तब्बल २२ धावा काढल्या होत्या.१२ व्या षटकांत इंग्लंडने १०० धावांचा टप्पा पार केला होता आणि सामन्यांत इंग्लंडचा संघ वरचढ होताना दिसत होता.इंग्लंडचे सलामीवीर अजुनही टी-२० च्या लयीतच दिसत होते.पहिल्या ३ षटकांत ३७ धावा दिल्यानंतर कर्णधार कोहलीने १५ व्या षटकांत प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीस बोलावले होते आणि कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत संघाला जेसन रॉयच्या रुपाने पहिले यश मिळवून दिले.रॉय पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णाने स्टोक्सला सुद्धा माघारी धाडत इंग्लंडला दुसरा धक्का दिला होता.

दोन गडी बाद झाल्यानंतरही इंग्लंडचाच संघ सामन्यांत वरचढ वाटत होता कारण बेअरस्टो अजुनही मैदानार टिकुन होता आणि तो आपल्या शतकाकडे आगेकुच करत होता पण “पालघर एक्सप्रेस” शार्दुल ठाकुरने आधी बेअरस्टोला ९४ धावांवर तर पुढच्याच षटकांत शार्दुलने मॉर्गन व बटलरला बाद करत सामना पुर्णपणे भारताच्या बाजुने वळवला होता.बिनबाद १३५ वरुन इंग्लंडची अवस्था २४.४ षटकांत ५ बाद १७६ झाली होती.सॅम बिलिंग व मोईन अलीने ६ व्या गड्यासाठी ४१ धावांची भागिदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता पण भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. ४२.१ षटकांत २५१ धावांत इंग्लंडचा डाव संपुष्टात आला आणि भारतीय संघाने सामना ६६ धावांनी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.इंग्लंडकडुन बेअरस्टोने ९४ तर जेसन रॉयने ४६ धावांची खेळी केली होती तर भारताकडुन पदार्पण करणाऱ्या प्रसिध्द कृष्णाने ४, शार्दुल ठाकुरने ३, भुवनेश्वर कुमारने २ तर कृणाल पंड्याने १ गडी बाद केला होता. भारताकडुन शिखर धवनने ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.मालिकेतील दुसरा सामना २६ मार्चला खेळविण्यात येणार आहे

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: