बेअरस्टो व स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडचा ६ गड्यांनी विजय, मालिकेत साधली १-१ ने बरोबरी

पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती त्यामुळे दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला होता.तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मालिकेत टिकुन राहण्यासाठी विजय आवश्यक होता.दुखापतग्रस्त इयॉन मॉर्गनच्या जागी यष्टिरक्षक जोस बटलरवर इंग्लंड संघाच्या कर्णधार पदाची जिम्मेदारी आली होती.कर्णधार बटलरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.इंग्लंडने मॉर्गन,सॅम बिलिंग्स व मार्क वुडच्या जागी डेविड मलान, लिविंगस्टोन व टोपलीला संघात स्थान देण्यात आले तर भारतीय संघाने पहिल्या सामन्यांत क्षेत्ररक्षणा दरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली होती.  

      पहिल्या सामन्यांत शानदार ९८ धावांची खेळी खेळणाऱ्या शिखर धवनकडुन तश्याच कामगिरीची अपेक्षा होती तर दुसरीकडे रोहित शर्मा सुद्धा मोठी खेळी खेळण्यास उत्सुक होता.पण शिखर धवन जरा चाचपडतच होता त्यात चौथ्याच षटकांत धवनच्या रुपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसला.रोहित शर्मा चांग्लाय लयीत दिसत होता पण तो सुद्धा २५ धावा काढुन माघारी परतला होता.३७ धावातं २ गडी गमावल्याने डाव सावरण्याची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली आणि के एल राहुलवर आली होती. विराट-राहुलच्या जोडीने धावफलक हलता ठेवला होता पण धावगती मात्र ५ च्या आसपास होती.दोघांची जोडी चांगली जमली होती. दोघेही आपली मागच्या सामन्यांतील खेळीलाच पुढे नेत आहे असे दिसत होते. दोघांनी आपापली अर्धशतके पुर्ण केली होती त्यातच पुन्हा एकदा विराट (६६) आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.विराट बाद झाला तेव्हा भारताने ३२ षटकांत १५६ धावा केल्या होत्या.भारताला मोठी धावसंख्या गाठण्यासाठी के एल राहुलने जास्तीत जास्त वेळ टिकुन राहणे महत्त्वाचे होते.

      कोहलीच्या जागी मैदानात आलेल्या रिषभने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला होता पण जम बसल्यानंतर रिषभने आपले फटके खेळण्यास सुरुवात केली होती.३९ षटकांत भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा पार केला होता त्यामुळे उर्वरित ११ षटकांत जास्तीत जास्त धावा काढण्याची जिम्मेदारी राहुल-पंतवर होती.मैदानावर जम बसलेल्या राहुल व पंतने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत होते आणि धावांचा वेग वाढला होता. त्यातच राहुलने आपले ५ वे एकदिवसीय शतक साजरे केले.राहुल-पंतच्या जोडीने चौथ्या गड्यासाठी ८० चेंडूत ११३ धावा जोडल्या होत्या.राहुल(१०८) बाद झाल्यानंतरही पंतने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होत्या त्याला हार्दिक पंड्याने शानदार साथ दिली.महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल,पंत व हार्दिकच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या १० षटकांत भारतीय संघाने तब्बल १२६ धावा फटकावल्या. शेवटी भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावत ३३६ धावांपर्यंत मजल मारली.भारताकडुन राहुले १०८, पंतने ७७ तर कोहली ६६ धावांची खेळी केली होती तर इंग्लंडकडुन टोपली व टॉम करनने प्रत्येकी २ तर आदिल राशिद व सॅम करनने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.

      ३३७ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवल्याने भारतीय संघ वरचढ वाटत होता पण इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉय व बेअरस्टोने आक्रमक पवित्रा घेतला होता.ज्याप्रकारे पहिल्या सामन्यांत रॉय-बेअरस्टोच्या जोडीने सुरुवात केली होती होती.९ व्या षटकांत इंग्लंडने बिनबाद ५० धावा केल्या होत्या कोणताच गोलंदाज इंग्लंडच्या सलामीवीरांपुढे टिकु शकला नाही.बघता-बघता इंग्लंडचा संघ लक्ष्याकडे जोरदार आगेकुच करत होता.रॉय व बेअरस्टोने आपापले अर्धशतक साजरे केले होते शेवटी रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत रॉयला ५५ धावांवर धावबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले होते.रॉय नंतर मैदानात आलेल्या बेन स्टोक्सला सोबत घेत बेअरस्टो धावसंख्या पुढे नेत होता.स्टोक्स-बेअरस्टोची जोडी सुद्धा चांगली जमली होती त्यातच पहिल्या सामन्यांत ६ धावांनी शतक हुकलेल्या बेअरस्टो आपले ११ शतक झळकावले त्यापाठोपाठ बेन स्टोकने ४० चेंडूत आपले अर्धशतक झळकावले होते.

      बेन स्टोक्स- जॉनी बेअरस्टोची भागिदारी सामना भारतीय संघासाठी अडथळा ठरली होती.त्यातच अर्धशतक झळकावल्यानंतर स्टोक्सने कुलदिप यादव व कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत पुढील ११ चेंडूत स्टोक्सने ९९ धावांपर्यंत मजल मारली होती.स्टोक्स शतक झळकावेल असे दिसत असतानाच भुवनेश्वर कुमारने स्टोक्सला पंत करवी झेलबाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने आपल्या एकाच षटकांत बेअरस्टो(१२४) व बटलरला बाद करत दोन धक्के दिले पण त्यानंतर डेविड मलान (नाबाद १५) व लिविंगस्टोन (नाबाद २७) ने ५ व्या गड्यासाठी नाबाद ५० धावांची भागिदारी करत संघाला ४४ व्या षटकांतच विजय मिळवून दिला आणि मालिकेत इंग्लंडने १-१ने बरोबरी साधली. इंग्लंडकडुन बेअरस्टोने १२४, स्टोक्सने ९९ तर रॉयने ५५ धावांची खेळी केली तर भारताकडुन प्रसिद्ध कृष्णाने २ तर भुवनेश्वर कुमारने १ गडी बाद केला. सामन्यांत १२४ धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.मालिकेतील तीसरा आणि शेवटचा सामना २८ मार्च रोजी खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: