कोण ठरणार एकदिवसीय मालिकेचा विजेता?

भारतीय संघाने पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवला होता पण दुसऱ्या सामन्यांत जॉनी बेअरस्टो (१२४) व बेन स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने ६ गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे.त्यामुळे रविवारी होणाऱ्या मालिकेतल्या तीसऱ्या आणि शेवटच्या सामन्यांत विजय मिळवून मालिका आपल्या नावे करण्यास दोन्ही उत्सुक असतील.पहिल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडने नाणेफेक जिकंत गोलंदाजाचा निर्णय घेतला होता पहिल्या सामन्यांत ते अपयशी ठरले पण दुसऱ्या सामन्यांत त्यांना यश मिळाले त्यामुळे शेवटच्या सामन्यांत नाणेफेकीचा कौल महत्त्वपुर्ण ठरणार हे मात्र नक्की.

      भारतीय संघाचा विचार करता दोन्ही सामन्यांत भारतीय संघाची सलामी हवी तशी चालली नाही त्यामुळे तीसऱ्या सामन्यांत रोहित व धवनकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल.पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या रोहितकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.तर कोहली व राहुलने दोन्ही सामन्यांत शानदार फलंदाजी केली आहे तश्याच कामगिरीची अपेक्षा दोघांकडुन असेल.गोलंदाजीचा विचार करता दोन्ही सामन्यांत बेअरस्टो व जेसन रॉयने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला होता पहिल्या सामन्यांत गोलंदाजांनी पुनरागमन केले होते पण दुसऱ्या सामन्यांत त्यांना अपयश आले.कुलदिप यादव व कृणाल पंड्या पुर्णपणे अपयशी ठरले त्यात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसल्याने भारतीय संघाकडे सहावा गोलंदाज नाही त्यामुळे तीसऱ्या सामन्यांत भारतीय संघाला गोलंदाजाच्या सहाव्या पर्यायासह उतरावे लागेल हे मात्र नक्की तसेच दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या कुलदिप यादवच्या जागी यजुवेंद्र चहलची वर्णी लागु शकते.

      पहिल्या सामन्यांतील पराभवानंतरही इंग्लंडच्या सलामीवीरांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता त्यानंतर बेन स्टोक्सच्या आक्रमक फलंदाजीने सामना पुर्णपणे इंग्लंडच्या बाजुने वळवला होता.नियमित कर्णधार इयॉन मॉर्गन दुखापतग्रस्त झाल्याने जोस बटलरने संघाचे नेतृत्व करत संघाला मालिकेत बरोबरी साधुन दिली.मार्क वुडच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रीस टोपलीने शानदार गोलंदाजी केली होती तसेच त्याला राशिद व मोईन अलीने शानदार गोलंदाजी केली होती तश्याच कामगिरीची अपेक्षा इंग्लंड संघाला शेवटच्या सामन्यांतही असेल. कसोटी मालिकेपाठोपाठ टी-२० मालिका गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ दौऱ्याचा शेवट गोड करणार की भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही आपल्या नावे करतो हे पाहावे लागेल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: