अटीतटीच्या सामन्यांत भारताची इंग्लंडवर ७ धावांनी मात, भारताचा एकदिवसीय मालिकेवर २-१ ने कब्जा

मालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आहे त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक होता.मागच्या सामन्यांत ३३६ धावा करुन देखिल भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते तर दुसरीकडे ३३७ धावांचे आव्हान ४४ व्या षटकांतच पार केल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला होता.सलग तीसऱ्या सामन्यांत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.भारतीय संघात एक बदल करत कुलदिप यादवच्या जागी टी नटराजनला तर इंग्लंडने टॉन करनच्या जागी मार्क वुडला संधी दिली होती.

      पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या रोहितने आश्वासक सुरुवात केली होती आणि पहिल्या सामन्यांत ९८ धावांची खेळी केलेला शिखर धवन सुद्धा चांगल्या लयीत दिसत होता.पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाला पहिला १० षटकांत हव्या तश्या धावा काढता आल्या नव्हत्या पण आज मात्र दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती.शिखर धवनने आपले अर्धशतक साजरे केले होते आणि १४ षटकांत भारताने १०० धावांचा टप्पा पार केला होता. १४ षटकांत बिनबाद १०० ही शानदार सुरुवात होती.पण त्यानंतर चांगल्या लयीत दिसणाऱ्या रोहित शर्माला ३७ धावांवर आदिल राशिदने आपल्या गुगलीने त्रिफळाचीत केले आणि बघता-बघता बिनबाद १०३ वरुन भारतीय संघाची अवस्था ३ बाद १२१ झाली होती.मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित(३७),धवन(६७) व विराट(७) माघारी परतले होते.

      झटपट तीन गडी बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता पण रिषभ पंतने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली होती तर दुसरीकडे राहुल चाचपडत होता.राहुल सुद्धा ७ धावा काढुन माघारी परतला होता.राहुल बाद झाला तेव्हा भारताने २४.२ षटकांत ४ गडी गमावत १५७ धावा केल्या होत्या.चार गडी गमावल्यानंतरही रिषभ पंत व राहुलनंतर मैदानात आलेल्या हार्दिक पंड्याने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.या दोघांनी राशिद व मोईन अलीच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत धावगतीचा वेग कायम ठेवला होता.रिषभने सलग दुसऱ्या सामन्यांत अर्धशतक झळकावले होते आणि तो आपल्या शतकाकडे आगेकुच करत होता पण सॅम करनने पंतला ७८ धावांवर बाद करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर हार्दिक ६४ धावा काढुन बाद झाला होता.शेवटी शार्दुल ठाकुरने ३० व कृणाल पंड्याने २५ धावा काढत संघाला ३२९ धावांपर्यंत पोहचवले होते.महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंत व हार्दिक खेळत असताना भारतीय संघ ३५०-३६० पर्यंत पोहचेल असे दिसत होते पण महत्वाच्या षटकांत गडी गमावल्याने भारतीय संघ ४८.२ षटंकात ३२९ धावांपर्यंत पोहचु शकला.इंग्लंडकडुन मार्क वुडने ३, आदिल राशिदने २ तर मोईन अली,टॉप्ली,बेन स्टोक्स व सॅम करनने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.

      एकवेळ भारतीय संघ ३५०-३६० पर्यंत पोहचेल असे दिसत असताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला ३२९ धावांवर रोखले होते.पहिल्या दोन सामन्यांत शानदार सलामी दिलेल्या जेसन रॉय व जॉनी बेअरस्टोकडुन तश्याच कामगिरीची अपेक्षा होती आणि रॉयने तशी सुरुवात केली होती पण पहिल्याच षटकांतील शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने रॉयला १४ धावांवर त्रिफळाचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले होते त्यानंतर आपल्या पुढील षटकांत बेअरस्टोला बाद करत भारताला शानदार सुरुवात करुन दिली होती.मागच्या सामन्यांत शानदार ९९ धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने नेहमीच्याच लयीत सुरुवात केली होती.त्यातच हार्दिक पंड्याने स्टोक्सला एक जिवनदान दिले होते.त्यामुळे हे जिवनदान भारतीय संघाला महाग पडेल का याकडे सर्वांचे लक्ष्य होते.त्यानंतर नटराजनने स्टोक्सला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले होते. स्टोक्स पाठोपाठ कर्णधार बटलर सुद्धा माघारी परतला होता.३३० चा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था १५.१ षटकांत ४ बाद ९५ धावा केल्या होत्या त्यामुळे भारतीय संघाने सामन्यांवर पकड मिळवली असे वाटत होते पण डेविड मलान व लियम लिविंगस्टोनने ५ व्या गड्यासाठी ६० धावा जोडल डाव सांभाळला होता.मलान व लिविंगस्टोनची जोडी धोकादायक होते असे दिसत असतानाच शार्दुल ठाकुरने दोन षटकांत लिविंगस्टोन व मलानला माघारी धाडत संघाला सामन्यांवर पकड मिळवून दिली होती.

       झटपट दोन गडी गमावल्यानंतरही त्यानंतर आलेल्या मोईन अली व सॅम करनने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.मोईन अली बाद झाल्यानंतरही सॅम करनने आधी राशिदला सोबत घेत ८ व्या गड्यासाठी ५७ धावा जोडत संघाला सामन्यांत टिकुन ठेवले होते.राशिद बाद झाला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ६४ चेंडूत ७३ धावांची आवश्यकता होती तर भारताला फक्त दोन गड्यांची आवश्यकता होती.भारतीय संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण सॅम करन मात्र आज वेगळ्याच लयीत दिसत होता.करनने आपले अर्धशतक साजरे केले होते राशिदनंतर मार्क वुडला सोबत घेत सॅम करन लक्ष्याकडे आगेकुच करत होता.शेवटच्या ४ षटकांत इंग्लंडला ४१ धावांची आवश्यकता होती त्यामुळे सॅम करनला मोठे फटके खेळण्याची आवश्यकता होती त्यातच ४७ व्या षटकांत सॅम करनने शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत तब्बल १८ धावा वसुल करत आवश्यक धावगती ७ च्या आसपास आणली होती पण त्यानंतर भुवनेश्वर कुमार व हार्दिक पंड्याने दोन षटकांत फक्त ९ धावा दिल्या होत्या त्यात हार्दिकच्या षटकांत सॅम करन व मार्क वुडला जिवनदान मिळाले होते. शेवटच्या षटकांत इंग्लंडला १४ धावांची आवश्यकता होती आणि षटक टाकण्याची जिम्मेदारी होती ती टी नटराजनवर.पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्क वुड धावबाद झाला त्यानंतर नटराजनने शानदार गोलंदाजी करत सॅम करनला मोठे फटके खेळण्यापासुन रोखत इंग्लंडला ३२२ धावांवर रोखत संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयांसह भारतीय संघाने २-१ ने एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला.इंग्लंडकडुन सॅम करनने नाबाद ९५, डेविड मलानने ५० धावांची खेळी केली तर भारताकडुन शार्दुल ठाकुरने ४, भुवनेश्वर कुमारने ३ तर नटराजने १ गडी बाद केला होता.सामन्यांत इंग्लंडकडुन नाबाद ९५ धावांची खेळी आणि १ गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर मालिकेत एक शतक व एक अर्धशतकाच्या सहाय्याने २१९ धावा फटकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: