रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली समोर धोनीच्या चेन्नईचे आव्हान

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ च्या सत्राला सुरुवात झाली आहे. आज सत्राच्या दुसऱ्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चैन्नई सुपर किंग समोर आव्हान असेल ते युवा रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा संघाचे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२० चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाची नेतृत्वाची जबाबदारी युवा यष्टिरक्षक रिषभ पंतवर आली आहे.एकीकडे दिल्लीचा संघ आयपीएल २०२० ची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे मागील सत्रातील अपयश विसरुन नव्या सत्राची धडाक्यात सुरुवात करण्याच्या तयारीने चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसेल.

चेन्नई संघाचा विचार करता सुरेश रैना व रॉबिन उथप्पाच्या येण्याने फलंदाजी काहीशी मजबुत झाली आहे तसेच अष्टपैलु खेळाडुंचा भरणा असल्याने चेन्नईचा संघ कागदावर मजबुत दिसतो आहे.पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रैना, धोनी तसेच दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला रविंद्र जडेजाने मागील तीन महिन्यांत सामने खेळले नाहीत त्यामुळे ते कशी कामगिरी करतात यावर संघाची मदार असेल.चेन्नईच्या फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार धोनी, सुरेश रैना, अंबाती रायडु आणि फाफ ड्यु प्लेसिसवर तर दिपक चहर, शार्दुल ठाकुर, जडेजा, सॅम करन, इम्रान ताहीरवर गोलंदाजीची धुरा असेल.

मागच्या सत्रातील उपविजेता दिल्ली संघाची फलंदाजी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमुळे काहिशी कमजोर वाटते पण स्टिव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे त्याची जागा घेऊ शकतात. दिल्लीच्या फलंदाजीची धुरा असेल ती रिषभ पंत, शिखर धवन, पृथ्वी शॉ, मार्कस स्टॉयनिस तर दिल्लीच्या फिरकी गोलंदाजीची मदार असेल ती रविचंद्रन अश्विन व अमित मिश्रा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या सत्रात दिल्लीसाठी शानदार कामगिरी करणारे कागिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्खिया सुरुवातीच्या सामन्यांत खेळणार नाही त्यामुळे इशांत शर्मा, ख्रिस वोक्स व उमेश यादववर मोठी जबाबदारी असेल. रिषभ पंत पहिल्यांदाच आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे त्यामुळे फलंदाजीसोबतच त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीवर देखिल सर्वांची नजर असेल.

सर्वोत्तम ११ – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस,मोईन अली, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/सॅम करन, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर

सर्वोत्तम ११ –  रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर/ सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव

ड्रीम ११ – रिषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार) शिखर धवन, सुरेश रैना, मार्कस स्टॉयनिस, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: