रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पहिल्याच सामन्यांत गतविजेते मुंबई इंडियन्सवर २ गडी राखुन विजय, हर्षल पटेल ठरला सामनावीर

आयपीएल २०२० नंतर काही महिन्यांतच आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या मधील सामन्यांने होत होता. बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.काईल जेमिसन, ख्रिस लीन व मार्को जेनेसन आपल्या संघासाठी पहिला वहिला सामना खेळत होता. एकीकडे मुंबईचा संघ दोन फिरकी गोलंदाजांसह उतरला होता तर दुसरीकडे बेंगलोरने संघात ३ फिरकीपटु खेळवले होते.

मुंबईकडुन कर्णधार रोहित शर्मा सोबत क्विंटन डी कॉकच्या जागी ख्रिस लीन सलामीला आला होता.मुंबईसाठी आपला पहिला सामना खेळणारा ख्रिस लीन चाचपडतच खेळत होता तर रोहित शर्मा मात्र चांगल्या लयीत दिसत होता त्याने चहलच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मारलेला षटकार जबरदस्त होता पण एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात लीनच्या चूकीमुळे रोहित (१९) धावबाद झाला होता. रोहित नंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव जबरदस्त सुरुवात केली होती. सुर्यकुमारच्या पवित्र्यानंतर लीन सुद्धा आक्रमक पवित्रा घेत गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला होता. सुर्य़कुमार यादव व लीनची जोडी बेंगलोरसाठी धोकादायक ठरताना दिसत होती त्यातच आपला पहिला वहिला सामना खेळणाऱ्या काईल जेमिसनने सुर्यकुमार यादवला ३१ धावांवर बाद करत आयपीएल मध्ये आपला पहिला गडी बाद केला.त्यानंतर ख्रिस लीन ४९ धावा काढुन माघारी परतला होता. १ बाद ९४ वरुन मुंबईची स्थिती ३ बाद १०५ झाली होती. शेवटच्या षटकांमध्ये मोठ्या धावा करण्याची जबाबदारी होती ती इशान किशन, हार्दिक पंडय्या आणि किरॉन पोलार्डवर.किशन व हार्दिकने थोडा प्रयत्न केला पण हर्षल पटेलच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईचा संघ २० षटकांत ९ गडी गमवत फक्त १५९ धावांपर्यत पोहचला होता. बेंगलोरकडुन हर्षल पटेलने २७ धावांत ५ गडी बाद करत मुंबईला रोखण्यात महत्त्वाची भुमिका बजावली होती.

१६० धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानात उतरली होती. ४.२ षटकांत ३६ धावांची सलामी दिल्यानंतर कृणाल पंड्याने आपल्या पहिल्याच षटकांत सुंदरला बाद करत संघाला पहिले यश मिळवुन दिले.सुंदरच्या जागी मैदानात आलेल्या रजत पटिदारला बोल्टने त्रिफळाचीत करत बेंगलोरची स्थिती ५.५ षटकांत २ बाद ४६ केली होती. दोन झटपट गडी बाद झाल्याने कोहलीने मैदानावर टिकुन राहाणे महत्त्वाचे होते.पटिदार नंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आपल्या नेहमीच्या शैलीतच खेळत होता त्यामुळे कोहलीने सावध पवित्रा घेतला होता. मॅक्सवेलने राहुल चहर विरुद्ध मारलेले स्विच हिटचे षटकार जबरदस्त होते.बघता-बघता कोहली व मॅक्सवेलच्या जोडीने ५० धावांची भागिदारी पुर्ण केली होती. मुंबईला सामन्यांत टिकुन राहण्यासाठी गडी बाद करण्याची आवश्यकता होती त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने १३ व्या षटकांत जसप्रित बुमराहला गोलंदाजीस आणले होते आणि कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत षटकाच्या तीसऱ्या चेंडूवर कोहलीला ३३ धावांवर पायचीत करत बुमराहने आपल्या संघाला मोठे यश मिळवून दिले होते.

कोहली बाद झाला तेव्हा बेंगलोरला विजयासाठी ४५ चेंडूत ६२ धावांची आवश्यकता होती.बेगलोर संघाची जबाबदारी होती ती खेळपट्टीवर जम बसलेल्या मॅक्सवेल व डिव्हिलियर्सवर होती पण आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मार्को जानसनने मॅक्सवेल (३९) आणि शाहबाझ अहमदला बाद करत बेंगलोरची अवस्था १५ षटकांत ५ बाद १०६ झाली होती. १६ व्या षटकांत डिव्हिलियर्सने चहरच्या गोलंदाजीवर १५ धावा वसुल करत आवश्यक धावगती १० च्या आत आणली होती. त्यानंतर बोल्टने टाकलेल्या १८ व्या षटकांत १५ धावा आणि बुमराहने टाकलेल्या १९ व्या षटकांत १२ धावा वसुल करत सामन्याचे पारडे पुर्णपणे बेंगलोरकडे झुकवले होते. शेवटच्या षटकांत ७ धावांची आवश्यकता होत्या. चौथ्या चेंडूवर डिव्हिलियर्स (४८) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला होता पण शेवटी हर्षल पटेलने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत बेंगलोरला सत्राच्या पहिल्याच सामन्यांत २ गडी राखुन विजय मिळवून दिला. मुंबईकडुन बुमराह व मार्को जॅन्सेनने प्रत्येकी २ गडी बाद केले होते. बेंगलोरकडुन २७ धावांत ५ गडी बाद करणाऱ्या हर्षल पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: