शिखर धवन व पृथ्वी शॉच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीचा चैन्नईवर ७ गडी राखुन विजय

दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपक किंग दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. एकीकडे अनुभवी कर्णधार तर दुसरीकडे आयपीएल मध्ये पहिल्यांदाच दिल्ली संघाचे नेतृत्व करणारा युवा रिषभ पंत. नवखा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चैन्नईच्या अष्टपैलु खेळाडुंचा भरणा असल्याने काहीसा वरचढ वाटत होता तर दिल्लीने सुद्धा ख्रिस वोक्स व टॉम करनला संघात घेत फलंदाजीत ताकद वाढवली होती.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या चैन्नईला सलामीवीराकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत ७ धावांत दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले होते.७ धावांत २ गडी गमावल्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अली व सुरेश रैनाने दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत धावगती ८ च्या आसपास राखली होती.९ व्या षटकांत अश्विनने मोईन अलीला ३६ धावांवर धवनकरवी झेलबाद करत ६० धावांवर तीसरा झटका दिला होता पण त्यानंतर खेळपट्टीवर जम बसलेल्या रैनाने रायडुला सोबत घेत धावसंख्या १०० च्या पार नेली होती. ५.२ षटकांत ६३ धावा जोडत या दोघांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. १३.४ षटकांत ३ बाद १२३ अश्या सुस्थितीत असताना दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत चैन्नईची अवस्था १५.३ षटकांत ६ बाद १३७ केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायडु, रैना आणि धोनी माघारी परतले होते. एकवेळ चैन्नई १९०-२०० पर्यंत पोहचेल असे वाटत असताना चैन्नईचा संघ अडचणीत सापडला होता.शेवटी सॅम करन (३४) व रविंद्र जडेजाने (नाबाद २६) ७ व्या गड्यासाठी ५१ धावा संघाला १८८ धावांपर्यंत मजल मारुन दिली होती.चैन्नईकडुन सुरेश रैनाने सर्वाधिक ५४ धावा केल्या होत्या तर दिल्लीकडुन ख्रिस वोक्स व आवेश खानने प्रत्येकी २ गडी बाद केले होते.

१८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. पहिल्या षटकांपासुन शॉ आणि धवन चांगल्या लयीत दिसत होते. ५ व्या पृथ्वी शॉने शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर मारलेले तीन चौकार जबरदस्त होते. पृथ्वी शॉ फटके पाहता तो आज वेगळ्याच मुड मध्ये दिसत जणु तो आपला विजय हजारे चषकातील फॉर्म कायम ठेवताना दिसत होता. पॉवर प्लेच्या ६ षटकांत दिल्लीने बिनबाद ६५ धावा करत सामन्यांत वर्चस्व निर्माण केले होते. फिरकी गोलंदाज मोईन अली व रविंद्र जडेजाची पहिली षटके सावध खेळल्यानंतर त्या दोघांच्या गोलंदाजीवर देखिल धवन व शॉने हल्ला चढवला होता.१० व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत शॉने २७ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले होते. शॉ पाठोपाठ धवनने देखिल आपले अर्धशतक साजरे केले होते. ११ व्या षटकांत बिनबाद १०० धावांचा टप्पा पार करत सामन्यांवर दिल्लीने पकड मिळवली होती.शॉ व धवनची जोडी संघाला विजय मिळवून देईल असे दिसत असताना शॉ ७२ धावांवर बाद झाला होता.शिखर धवन देखिल आपल्या शतकाकडे आगेकुच करत होता पण पण शार्दुल ठाकुरने धवनला ८५ धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा झटका दिला होता. धवन बाद झाला तेव्हा दिल्लीला ३.३ षटकांत २२ धावांची आवश्यकता होती. १९ व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर लॉंग ऑनला चौकार मारत कर्णधार रिषभ पंतने आपल्या कर्णधारपदातील पहिल्याच सामन्यांत चैन्नईवर ७ गडी राखुन विजय मिळवून दिला. चैन्नईकडुन शार्दुल ठाकुरने २ गडी बाद केले होते. सामन्यांत ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी खेळणाऱ्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: