मॉर्गन आणि डेविड वॉर्नरमध्ये कोण ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० च्या सत्रात थोडक्यात प्ले ऑफ मधील स्थान हुकलेला कोलकत्ता नाईट रायडर्सचा संघ नव्या सत्राची शानदार सुरुवात करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैद्राबादला देखिल चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल. सगळ्याच बाजुने विचार करता फलंदाजीसोबतच गोलंदाजीत सनरायझर्स हैद्राबादचा संघ कागदावर तर वरचढ दिसतो आहे.सामना चैन्नईच्या खेळपट्टीवर होत असल्याने फिरकी गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची असेल.

सनरायझर्स हैद्राबाद संघाचा विचार करता भुवनेश्वर कुमार,टी नटराजन, संदिप शर्मा यांसारख्या जलदगती गोलंदाजांसोबतच राशिद खान आणि मोहम्मद नबी सारख्या फिरकी गोलंदाजांचा भरणा देखिल हैद्राबाद संघात आहे. हैद्राबादच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल ती कर्णधार डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन आणि मनिष पांडेवर असेल. तसेच मागच्या सत्रात क्रिकेट समिक्षकांचे लक्ष्य वेधुन घेतलेल्या प्रियम गर्ग व अब्दुल समदवर देखिल सर्वांच्या नजरा असतील. नबी, विजय शंकर आणि जेसन होल्डरसारखे अष्टपैलु खेळाडु संघात असल्याने हैद्राबाद संघ सगळ्याच बाजुने तगडा वाटत आहे.

आयपीएल २०२० च्या सत्रात दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्याने इयॉन मॉर्गनवर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती पण या सत्रात पहिल्यापासुनच मॉर्गन कोलकत्ता संघाचे नेतृत्व करणार आहे. कोलकत्ता संघात आंतरराष्ट्रीय खेळाडुंसोबतच भारतीय खेळाडुंचा चांगला समोतल आहे. कोलकत्ता संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती शुभमन गिल, नितीश राणा, मॉर्गन व आंद्र रसेलवर तर गोलंदाजी मदार असेल ती सुनिल नारायण, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि इंग्लंडविरुद्च्या मालिकेत भारतीय संघाकडुन पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णावर. यांसारखे गोलंदाज संघात असताना देखिल सध्या खराब फॉर्ममध्ये असलेला कुलदिप यादव कोलकत्ता संघासाठी अडचणी ठरु शकतात. आता हैद्राबाद आणि कोलकत्ता पैकी कोणता संघ विजयी सुरुवात करतो हे पाहावे लागेल.

सर्वोत्तम ११ – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, प्रियम गर्ग/अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा, टी नटराजन, शादाब नदिम

सर्वोत्तम ११ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), सुनिल नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी/संदिप वॉरियर

ड्रीम ११ – डेविड वॉर्नर (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), मनिष पांडे, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स,

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: