मनिष पांडे व बेअरस्टोच्या अर्धशतकानंतरही कोलकत्त्याचा हैद्राबादवर १० धावांनी विजय, नितीश राणा (८०) ठरला सामनावीर

सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकत्ता नाईट रायडर्स दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते.आयपीएल मधील दोन विदेशी कर्णधार एकमेंकापुढे उभे ठाकणार होते. नाणेफेक जिंकुन हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.चैन्नईच्या खेळपट्टीवर हैद्राबादचा संघ राशिद खान व मोहम्मद नबीसह तर कोलकत्ताचा संघ हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती व शाकिब अल हसनसह मैदानात उतरला होता.

हैद्राबादच्या संघासमोर मोठे आव्हान ठेवण्यासाठी कोलकत्त्याला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. कोलकत्याकडुन सलामीला आलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिल पैकी नितीश राणा पहिल्या चेंडूपासुन आक्रमक दिसत होता. नितीशने संदिप शर्मा विरुद्ध मारलेले चौकार लाजवाब होते. नितीश राणाच्या फटकेबाजीमुळे कर्णधार वॉर्नरला गोलंदाजीत सतत बदल करावे लागत होते.६ षटकांत कोलकत्ताने बिनबाद ५० धावांचा टप्पा पार केला होता आणि संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता.७ व्या षटकांत राशिद खानने शुभमन गिलला त्रिफळाचीत करत कोलकत्ताला ५३ धावांवर पहिला धक्का दिला होता.

शुभमन नंतर मैदानात आलेल्या राहुल त्रिपाठीने देखिल आक्रमक सुरवात केली होती आणि राहुल-नितीशची जोडी हैद्राबादच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार करत होते. राहुल व नितीशच्या जोडीने १० च्या आसपास धावगती राखली होती. नितीशनंतर राहुलने देखिल आपले अर्धशतक साजरे केले होते पण अर्धशतक झळकावल्यानंतर राहुल त्रिपाठी माघारी परतला होता तेव्हा कोलकत्ताने १५.२ षटकांत १४६ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्याच्या इराद्याने त्रिपाठीनंतर आंद्रे रसेल मैदानात आला होता पण तो सुद्धा झटपट माघारी परतला होता. २ बाद १४६ वरुन कोलकत्याची अवस्था ५ बाद १६० करत सनरायझर्सने कोलकत्त्याला मोठ्या धावसंख्येपासुन थोडे रोखले असे दिसत होते पण शेवटी दिनेश कार्तिकने ९ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी करत संघाला १८७ धावांपर्यंत पोहचवले होते. कोलकत्त्याकडुन नितिश राणाने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली तर हैद्राबादकडुन राशिद खान व मोहम्मद शमीने प्रत्येकी २ गडी बाद केले होते.

१८८ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी हैद्राबादला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पण प्रसिद्ध कृष्णा व शाकिब अल हसनने अनुक्रमे वॉर्नर व वृद्धिमान साहाला बाद करत हैद्राबादची अवस्था २ बाद १० केली होती.दोन झटपट गडी गमावल्यामुळे मनिष पांडे व बेअरस्टोवर संघाची जिम्मेदारी आली होती. आवश्यक धावगती वाढत होती. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर बेअरस्टो व मनिष पांडेने शानदार फटके खेळत संघाला सामन्यांत टिकुन ठेवले होते.खेळपट्टीवर जम बसल्याने दोघांपैकी एकाने तरी शेवटपर्यत टिकुन राहाणे हैद्राबादसाठी महत्त्वाचे होते. १२ व्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार मारत बेअरस्टोने आपले अर्धशतक साजरे केले होते. बेअरस्टो आणि पांडेची भागिदारी कोलकत्यासाठी धोकादायक ठरताना दिसत होती त्यातच कमिन्सने बेअरस्टोला ५५ धावांवर बाद करत हैद्राबादला मोठा दिला होता.

बेअरस्टो बाद झाला तेव्हा हैद्राबादला विजयासाठी ७ षटकांत ८६ धावांची आवश्यकता होती त्यामुळे हैद्राबाद एका आक्रमक खेळीची आवश्यकता होती. मनिष पांडे खेळपट्टीवर टिकुन होता पण त्याला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. मोहम्मद नबी (१४) व विजय शंकर (११) मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने मनिष पांडे एकाकी पडला होता. १९ व्या षटकांत अब्दुल समदने कमिन्सच्या गोलंदाजीवर शानदार षटकांर मारत हैद्राबादच्या आशा वाढवल्या होत्या पण शेवटच्या षटकांत रसेलने शानदार गोलंदाजी करत हैद्राबादचा संघ विजयापासुन १० दुर राहिला. हैद्राबादवर १० धावांनी विजय मिळवत कोलकत्ताने सत्राची सुरुवात केली. शेवटी मनिष पांडे ६१ धावांवर नाबाद राहिला. कोलकत्ताकडुन प्रसिद्ध कृष्णाने २ तर कमिन्स, रसेल व शाकिब अल हसनने प्रत्येकी १ गडी बाद केला होता. सामन्यांत ५६ चेंडूत ८० धावांची खेळी केलेल्या नितीश राणाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: