नावातील बदल पंजाबसाठी ठरेल का लकी की सॅमसन साजरा करेल आपला पहिला विजय

मागील काही सत्रात कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरलेले युवा यष्टिरक्षक कर्णधार संजु सॅमसन नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स आणि के एल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स आज आपल्या पहिल्या सामन्यांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन पहिल्यांदाच आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल तसेच मागील सत्रापर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब नावाने ओळखला जाणारा संघ यावेळेस पंजाब किंग्स या नवीन नावाने मैदानात उतरणार आहे त्यामुळे नाव बदलल्याने कामगिरी सुधारते का हे पाहावे लागेल.

राजस्थान संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीची जबाबदारी मुख्यत्वे कर्णधार संजु सॅमसन, जोस बटलर, बेन स्टोक्स, डेविड मिलरवर असेल तर गोलंदाजीची धुरा असेल ती ख्रिस मॉरीस, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकटवर असेल. बेन स्टोक्स, राहुल तेवातिया, शिवम दुबे सारख्या अष्टपैलु खेळाडुंचा संघात समावेश असल्याने राजस्थानचा संघ कागदावर तरी तगडा दिसतो. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर संघाबाहेर असल्याने गोलंदाजीतख्रिस मॉरीसची कामगिरी महत्त्वाची असेल.

कर्णधार के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक आगरवाल, निकोलस पुरन यांसारख्या तगड्या फलंदाजांचा संघात समावेश असल्याने पंजाब संघ उर्वरित संघासाठी धोकादायक ठरु शकतो. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० च्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या डेविड मलानला संघात पंजाबने आपली फलंदाजी आणखीन मजबुत केली आहे. देशांतर्गत स्पर्धांत धडाकेबाद कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला संघात घेत खालची फेरी देखिल मजबुत केली आहे. गोलंदाजीत अनुभवी मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, जाय रिचर्डसन आणि युवा रवि बिश्नोईवर मोठी जबाबदारी असेल. मागील काही सत्रातील अपयश धुवुन टाकण्यासाठी दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसतील.

संभावित संघ –

राजस्थान रॉयल्स – संजु सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी

पंजाब किंग्स – के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, डेविड मलान, निकोलस पुरन, मनदिप सिंग/दिपक हुड्डा, शाहरुख खान, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदिप सिंग/मुर्गन अश्विन, जाय रिचर्डसन, रवि बिश्नोई

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: