संजु सॅमसनच्या शतकानंतरही अटीतटीच्या सामन्यांत पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्सवर ४ धावांनी विजय

आयपीएल २०२० च्या सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेले राजस्थान आणि पंजाबचे संघ एकमेकांपुढे उभे ठाकले होते.एकीकडे मागच्या सत्रापर्यंत किंग्स इलेव्हन पंजांबने ओळखला जाणारा संघ यासत्रात पंजाब किंग्स नावाने मैदानात उतरला होता तर दुसरीकडे राजस्थानचा संघा आपल्या नव्या कर्णधार संजु सॅमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरला होता. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

के एल राहुल, ख्रिस गेल,निकोलस पुरन सारख्या तगड्या फलंदाजांचा समावेश पंजाब संघात असल्याने राजस्थानला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. आयपीएल मध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या चेत सकारीयाने तीसऱ्याच षटकांत मयंकला माघारी धाडत पंजाबला पहिला झटका दिला होता.मयंक झटपट माघारी परतल्यानंतर राहुल व गेलने सावध पवित्रा घेतला होता पण त्यानंतर गेलने आफल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजीला सुरुवात केली होती.गेलने सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला होता त्यामुळे कर्णधार संजु सॅमसनने रियान परागला गोलंदाजीस आणले होते आणि कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत रियानने धोकादायक वाटणाऱ्या गेलला बाद करत संघाला मोठे यश मिळवुन दिले होते.

गेल बाद झाल्यानंतर मैदानात निकोलस पुरन येईल असे वाटत होते पण पुरनच्या जागी दिपक हुड्डा मैदानात उतरला होता.११ व्या षटकांत पंजाबने १०० धावांचा टप्पा पार करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. १३ व्या षटकांत शिवम दुबेच्या गोलंदाजीवर षटकार मारत के एल राहुलने आपले अर्धशतक साजरे केले होते. १३  आणि १४ व्या षटकांत प्रत्येकी २० धावा काढत राहुल-हुड्डाच्या जोडीने संघाला १५० धावांचा टप्पा गाठुन दिला होता.राहुल आणि दिपक हुड्डा ज्या लयीत खेळत होते ते पाहता ही जोडी राजस्थान समोर भलेमोठ आव्हान ठेवणार असेच दिसत होते.१८ व्या षटकांत दिपक हुड्डा (६४) आणि निकोलस पुरनला बाद करत ख्रिस मॉरीसने पंजाबला मोठ्या धावसंख्येपासुन काहीसे रोखले होते पण राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाबचा संघ २२१ धावांपर्यत पोहचला होता.पंजाबकडुन राहुलने सर्वाधिक ९१ धावा केल्या होत्या तर राजस्थानकडुन चेतन सकारीयाने ३ तर ख्रिस मॉरिसने २ गडी बाद केले होते.

पहिल्या डावानंतर पंजाबचा संघ सामन्यांत वरचढ दिसत होता पण राजस्थानच्या संघात स्टोक्स,बटलर आणि कर्णधार सॅमसनसारखे फलंदाज असल्याने ते सामना एकहाती फिरवु शकत होते पण पहिल्याच षटकांत शमीने स्टोक्सला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला होता.स्टोक्स पाठोपाठ मनन वोहरासुद्धा माघारी परतला होता. २५ धावांत २ गडी गमावल्यामुळे डाव सांभाळण्याची जिम्मेदारी सॅमसन व बटलर होती.सॅमसन व बचलरच्या जोडी धावगती १० च्या आसपास राखली होती पण आव्हान मोठे होते त्यामुळे या जोडीन मैदानावर टिकुन राहणे महत्त्वाचे होते.त्यातच आपला पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या जाय रिचर्डसनने स्लोव्हर यॉर्करवर बटलरला त्रिफळाचीत करत राजस्थानला ७० धावांवर तीसरा झटका दिला होता.

स्टोक्स आणि बटलर सारखे मोठे खेळाडु बाद झाल्याने संघाची जिम्मेदारी पुर्णपणे सॅमसनवर होती पण त्यासाठी त्याला चांगल्या साथीची आवश्यकता होती.संजु सॅमसन प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध शानदार फटके खेळत होता.सॅमसनने आपले अर्धतक साजरे केले होते.सॅमसनने शिवम दुबेसोबत ५३ व रियान पराग सोबत ५२ धावा जोडत संघाला सामन्यांत टिकुन ठेवले होते.रियान बाद झाल्यानंतर १८ व्या षटकांत सॅमसनने आपले शतक साजरे केले होते.शेवटच्या षटकांत १३ धावांची आवश्यकता होती.पहिल्या ५ चेंडूत ८ धावा काढल्यानंतर शेवटच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती पण शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सॅमसन ११९ धावांवर बाद झाला आणि अटितटीच्या सामन्यांत पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवत नव्या सत्राची विजयाने सुरुवात केली होती.पंजाबकडुन अर्शदिप सिंगने ३, मोहम्मद शमीने २ तर जाय रिचर्डसन व रिली मेरीडिथने प्रत्येकी १ गडी बाद केला होता. सामन्यांत ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी करणाऱ्या संजु सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: