बेंगलोरचा संघ विजयी लय कायम ठेवणार की सनरायझर्स हैद्राबादचा संघ सत्रातला पहिला विजय साजरा करेल?

पहिल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सत्राची विजयी सुरुवात केली होती.तर दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबादला कोलकत्त्या विरुद्ध १० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. चैन्नईत झालेल्या शेवटच्या दोन सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना संघांना अपयश आले आहे त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरु शकतो.

बेंगलोर संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल ती कर्णधार विराट कोहली, ए बी डी व्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि संघात पुनरागमन करणाऱ्या देवदत्त पाडिकलवर. मुंबई विरुद्धच्या सामन्यांत कोहली, डी व्हिलियर्स आणि मॅक्सवेलने महत्त्वाचे योगदान दिले होते. वॉशिंग्टन सुंदर, मॅक्सवेल आणि डॅनियल ख्रिस्टियन सारखे अष्टपैलु खेळाडु संघात असल्याने बेंगलोरचा संघ मजबुत दिसतो. रजत पाटिदार किंवा शहबाज अहमदच्या जागी पडिकलची संघात वर्णी होऊ शकते.

सनरायझर्स हैद्राबादचा संघ पाहिला तर फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि मनिष पांडे वर असेल पण मधली फळी काहीशी कमजोर दिसते. त्यामुळे हैद्राबादला संघाला बदल आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेअरस्टोने वॉर्नरसोबत सलामीला येणे संघासाठी उपयोगी ठरु शकते तसेच मोहम्मद नबीच्या जागी केन विल्यमनचे योगदान महत्त्वाचे असेल. चैन्नईची फलंदाजा कस पाहणाऱ्या खेळपट्टीवर विल्यसन महत्त्वाचा ठरले तसेच वृद्धिमान साहाच्या जागी केदार जाधवला संधी दिली जाऊ शकते.

संभावित संघ:-

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा, टी नटराजन, शादाब नदिम

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महम्मद अझरुद्दिन, डॅनियल ख्रिश्चियन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, काईल जेमिसन

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: