अटीतटीच्या सामन्यांत मुंबईचा कोलकत्यावर १० धावांनी विजय, राहुल चहर ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध २ गड्यांनी पराभव स्विकारल्यानंतर मुंबईचा संघ आपला आयपीएल २०२१ मधील विजय मिळवण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ मैदानात उतरला होता. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादवर विजय मिळवत कोलकत्त्याने सत्राची शानदार सुरुवात केली होती.तसे पाहिले तर आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच कोलकत्यावर हावी राहिला आहे. कोलकत्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकत्याने आपला मागील सामन्यांतील संघ कायम ठेवला होता तर मुंबईने संघात एक बदल करत ख्रिस लीनच्या जागी क्विंटन डी कॉकला संघात स्थान देण्यात आले होते.

ख्रिस लीनच्या जागी संघात आलेल्या डी कॉककडुन मोठ्या खेळीची मुंबई संघाला अपेक्षा होती पण दुसऱ्या षटकांत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डी कॉक त्रिपाठी कडे झेल देऊन परतला होता.डी कॉक नंतर मैदानात आलेल्या सुयर्कुमार यादवने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली होती.हरभजन सिंग आणि प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सुयर्कुमारने मारलेले फटके जबरदस्त होते. सुर्यकुमारच्या आक्रमक पवित्र्यामुळे रोहितने सावध पवित्रा घेतला होता. १० षटकांत कमिन्सच्या गोलंदाजीवर चेंडूला सीमारेषेपार धाडत सुर्य़कुमारने आपले अर्धशतक साजरे केले होते पण पुढच्याच षटकांत सुयर्कुमार यादव ५६ धावा काढुन माघारी परतला होता. सुर्यकुमार पाठोपाठ इशान किशन सुद्धा माघारी परतला होता.

झटपट दोन गडी गमावल्यामुळे रोहित शर्माने खेळपट्टीवर टिकुन रहाणे महत्त्वाचे होते. पुढील दोन षटकांत रोहितने मोठे फटके खेळत आपले इरादे स्पष्ट केले होते पण तोही कमिन्सच्या गोलंदाजीवर ४३ धावांवर त्रिफळाचीत झाला होता.महत्त्वाच्या षटकांत झटपट गडी गमावल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता.हार्दिक व कृणाल पंड्याने प्रत्येकी १५ धावा करत आपला हातभार लावला होता.शेवटी आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंद्रे रसेलने २ षटकांत १५ धावांत ५ गडी बाद करत मुंबईचा संघ १५२ धावांत संपुष्टात आणला होता.मुंबईकडुन सुर्य़कुमार यादवने सर्वाधिक ५६ धावा काढल्या होत्या तर कोलकत्त्याकडुन रसेलने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. सुर्यकुमार व रोहितच्या ७६ धावांच्या भागिदारीनंतर मुंबईचा संघ फक्त १५२ धावांत संपुष्टात आला होता.

मुंबईला १५२ धावांवर रोखत कोलकत्त्याने सामन्यावर पकड मिळवली होती. पहिल्या सामन्यांत शानदार कामगिरी करणाऱ्या नितीश राणाने व शुभमन गिलने शानदार सुरुवात केली होती. नितीश राणा जणु आपल्या मागच्या सामन्यांतील खेळीलाच पुढे नेतो आहे असे दिसत होते. लक्ष्य मोठे नव्हते त्यामुळे मुंबईला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती. राणा व गिलच्या जोडीने आवश्यक धावगती राखली होती. ९ व्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या राहुल चहरने शुभमन गिलला ३३ धावांवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले होते.गिल बाद झाला तेव्हा कोलकत्त्याने ७२ धावा केल्या होत्या.गिल पाठोपाठ त्रिपाठी व मॉर्गनला बाद करत चहरने कोलकत्याची अवस्था १२.५ षटकांत ३ बाद १०४ केली होती.

पाच षटकांत ३ गडी गमावल्यानंतरही अजुन नितीश राणा मैदानात टिकुन होता आणि राणाने सलग दुसऱ्या सामन्यांत आपले अर्धशतक साजरे केले होते. त्यातच चहरच्या चौथ्या षटकांतील शेवटच्या चेंडुवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राणा (५७) यष्टीचीत झाला होता.शेवटच्या ५ षटकांत कोलकत्याला ३१ धावांची आवश्यकता होती आणि शाकिब अल हसन, आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक सारखे फलंदाज बाकी होते त्यामुळे कोलकत्ता सामना सहज जिंकेल असे दिसत होते. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शाकिब माघारी परतला होता. त्यामुळे गोलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या रसेलवर कोलकत्याला विजय मिळवुन देण्याची जिम्मेदारी होती.परंतु बुमराह व कृणालच्या गोलंदाजीपुढे रसेल व दिनेश कार्तिकचा निभाव लागत नव्हता.त्यात रसेलला कृणाल व बुमराहने जिवनदान दिले होते. शेवटच्या षटकांत कोलकत्याला १५ धावांची आवश्यकता होती आणि मुंबईने गोलंदाजीची जिम्मेदारी दिली होती ती ट्रेंट बोल्टवर. षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर २ धावांवर समाधान मानावे लागल्या नंतर बोल्टने दोन सलग चेंडूवर रसेल व कमिन्सला बाद करत बोल्टने कोलकत्याच्या आशेवर पाणी फेरत मुंबईला १० धावांनी विजय मिळवून दिला.या विजयासह मुंबईने आयपीएल २०२१ च्या सत्रात गुणांचे खाते उघले आहे.मुंबईकडुन राहुल चहरने ४, बोल्टने २ तर कृणाल पंड्याने १ गडी बाद केला. सामन्यांत २७ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या राहुल चहरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: