पंत आणि सॅमसन या दोन युवा कर्णधारांमध्ये कोण मारणार बाजी?

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यांत कर्णधार संजु सॅमसनच्या ११९ धावा राजस्थान रॉयल्सला पराभवापासुन वाचवु शकल्या नाहीत पण २२२ धावांचा पाठलाग करताना सॅमसनने केलेली ११९ धावांची खेळी जबरदस्त होती तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने चैन्ईविरुद्ध शिखर धवन (८५) व पृथ्वी शॉ (७२) बळावर य़शस्वि पाठलाग केला होता. आज दिल्ली व राजस्थानचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असल्याने इथे फलंदाजांचा बोलबाला राहणार हे निश्चित आहे. पहिल्याच सामन्यांत राजस्थानचा अष्टपैलु खेळाडु बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने तो उर्वरीत आयपीएलला मुकणार आहे हा राजस्थानसाठी मोठा धक्का आहे. दोन्ही संघ नाणेफेक जिंकुन गोलंदाजी घेण्यास उत्सुक असतील.

बेन स्टोक्सचे संघाबाहेर होणे हा राजस्थानसाठी मोठा धक्का आहे आता त्याच्या जागी कोणाची वर्णी लागते हे  पाहावे लागेल. राजस्थानकडे लियम लिविंगस्टोन आणि डेविड मिलर सारखे पर्याय उपल्बध आहेत परंतु अष्टपैलु खेळाडु म्हणुन राजस्थानकडे मोठा खेळाडु नाही त्यामुळे फलंदाजीची जबाबदारी संजु सॅमसन, जोस बटलर, लिविंगस्टोन, मिलर, वोहरा आणि जैस्वालवर असेल. स्टोक्सच्या अनुपस्थितीत जैस्वाल सलामीला खेळु शकतो. तर गोलंदाजीची मदार असेल ती ख्रिस मॉरीस, चेतन सकारीया, मुस्तफिजुर रहेमान आणि श्रेयस गोपालवर. मुंबईच्या खेळपट्टीवर गोलंदांजांचा कस लागतो त्यामुळे गोलंदाजीत पर्याय आवश्यक आहेत.

कर्णधार म्हणुन आपल्या पहिल्याच सामन्यांत विजय मिळवत रिषभ पंतच्या दिल्ली संघाने शानदार सुरुवात केली आहे. गोलंदाजीत ख्रिस वोक्स आणि आवेश खानच्या कामगिरीनंतर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या भागिदारीने दिल्लीचा विजय निश्चित केला होता. त्यात पहिल्या सामन्याला मुकलेला कागिसो रबाडा या सामन्यांत खेळणार हे निश्चित आहे त्यामुळे दिल्लीची गोलंदाजी आणखीन मजबुत दिसते. गोलंदाजीसोबतच फलंदाजीत धवन, पंत, शॉ, रहाणे आणि स्टॉयनिस सारखे तगडे फलंदाज असल्याने दिल्लीचा संघ काहीसा वरचढ दिसत आहे आहे पण ते कामगिरीत सातत्य ठेवतात का हे पाहावे लागेल. मुंबईच्या खेळपट्टीवर नेहमीच गोलंदाजीची परीक्षा असते त्यामुळे रबाडा, अश्विन आणि मिश्राचा अनुभव दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरेल.

संभावित संघ

राजस्थान रॉयल्स – संजु सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, डेविड मिलर/लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, मुस्तफिजुर रहेमान, चेतन सकारीया

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वोक्स, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, आवेश खान

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: