गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर बेंगलोरचा हैद्राबादवर ६ धावांनी विजय, ५९ धावा करणारा मॅक्सवेल ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक होता. सनरायझर्स हैद्राबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैद्राबादने संघात दोन बदल करत मोहम्मद नबी व संदिप शर्माच्या जागी जेसन होल्डर व शाहबाझ नदिमला तर बेंगलोरने रजत पटिदारच्या जागी देवदत्त पडिकलने संघात स्थान मिळवले होते.

पडिकल व कोहलीने सावध सुरुवात केली होती त्यातच तीसऱ्या षटकांत भुवनेश्र कुमारने पडिकलला बाद करत संघाला पहिले यश मिळवुन दिले होते. कोहली चांगल्या लयीत दिसत होता पण तरी पण त्याचा स्ट्राईक रेट कमीच होता.तीसऱ्या क्रमांकावर आलेला शाहबाझ अहमद झटपट माघारी परतला होता. त्यानंतर पहिल्या सामन्यांत शानदार खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सोबत घेत कोहली डाव पुढे नेत होता. कोहली व मॅक्सवेलची भागिदारी ज्याप्रकारे पुढे जात होती ते पाहता बेंगलोरचा संघ १७०-१८० पर्यंत पोहचेल असे दिसत होते पण होल्डरने कोहलीला व पुढील षटकांत राशिद खानने डी व्हिलियर्सला बाद करत बेंगलोरची अवस्था २ बाद ९१ वरुन १३.४ षटकांत ४ बाद ९५ झाली होती. एका बाजुने गडी बाद होते होते पण मॅक्सवेलने दुसरी बाजू सांभाळली होती.मॅक्सवेलने जेमिसनसोबत २७ धावा जोडत धावसंख्या नेली होती. डावाच्या शेवटच्या षटकांत मॅक्सवेलने २०१६ नंतरचे आपले पहिले अर्धशतक साजरे केले होते. शेवटी बेंगलोरचा संघ निर्धारित २० षटकांत १४९ धावांपर्यंत पोहचला होता.हैद्राबादकडुन होल्डरने ३ तर राशिद खानने २ गडी बाद केले होते.

बेंगलोरला १४९ धावांत रोखत हैद्राबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. आता १५० धावांचा पाठलाग करण्याची जिम्मेदारी होती ती फलंदाजांवर.तीसऱ्याच षटकांत साहा बाद झाल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नर व मनिष पांडेची जोडी जमली होती. पहिल्या सामन्यांत अपयशी ठरलेला वॉर्नर चांगल्या लयीत दिसत होता मात्र मनिष पांडे मात्र चाचपडतच खेळत होता. वॉर्नरच्या फटकेबाजीमुळे मनिष पांडे वरचा दबाव कमी होत होता.वॉर्नर व पांडेची भागिदारी बेंगलोरसाठी धोकादायक ठरताना दिसत होती. तसेच वॉर्नरने आपले आयपीएल २०२१ मधील पहिले अर्धशतक साजरे केले होते. अर्धशतक झळकावल्यानंतर वॉर्नर आणखीन आक्रमक रुप धारण करेल असे वाटत होते पण १३ व्या षटकांत जेमिसनने वॉर्नरला ५४ धावांवर बाद करत मोठा अडथळा दुर केला होता.

वॉर्नर बाद झाला तेव्हा हैद्राबादला ४० चेंडूत ५४ धावांची आवश्यकता होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो मैदानात होते त्यामुळे हैद्राबाद आपला पहिला सामना जिकेल असेच दिसत होते. ४ षटकांत ३५ धावांची आवश्यकता होती पण १७ व्या षटकांत शाहबाझ अहमदच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो, मनिष पांडे आणि समद माघारी परतले आणि सामना हैद्राबादच्या हातातुन जाताना दिसत होता. महत्त्वाचे म्हणजे तीनही खेळाडु सारखाच फटका मारताना बाद झाले होत.शेवटी राशिद खानने ९ चेंडूत १७ धावा केल्या पण तो संघाला पराभवापासुन वाचवु शकला नाही आणि सनरायजर्स हैद्राबादला सलग दुसऱ्या सामन्यांत पराभव स्विकारावा लागला. हैद्राबादचा ६ धावांनी पराभव करत बेंगलोरने सलग दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली आहे. हैद्राबादकडुन वॉर्नरने सर्वाधिक ५४ धावा केल्या तर बेंगलोरकडुन शाहबाझ अहमदने ३ तर हर्षल पटेल व मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ गडी बाद केले. बेंगलोरकडुन सर्वाधिर ५९ धावा करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: