कोणता किंग ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० मध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या चैन्नई सुपर किंगने आयपीएल २०२१ च्या आपल्या पहिल्या सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स समोर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्या आव्हानाचा दिल्लीने सहज पाठलाग केला होता तर दुसरीकडे अटीतटीच्या सामन्यांत पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवत सत्राची विजयी सुरुवात केली होती.दोन्ही संघाने पहिल्या सामन्यांत मोठी धावसंख्या उभारली होती त्यामुळे आजच्या सामन्यांत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

चैन्नई संघाचा विचार करता सुरेश रैनाच्या संघात येण्याने चैन्नईची फंलदाजी आणखीन मजबुत झाली आहे हे त्याने पहिल्या सामन्यांतच दाखवुन दिले आहे. पहिल्या सामन्यांत त्रृतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस अपयशी ठरल्यानंतरही सॅम करन आणि रविंद्र जडेच्या फटकेबाजीमुळे चैन्नईचा संघ १८८ धावांपर्यंत पोहचला होता. आजच्या सामन्यांत चैन्नईला गायकवाड आणि ड्युप्लेसिसकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.तसेच तीसऱ्या सामन्यांत मोईन अली देखिल मागच्या सामन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल. गोलंदाजीचा विचार करता लुंगी एन्गिडीला कोणाच्या जागी संघात स्थान मिळते हे पाहावे लागेल. पहिल्या सामन्यांत शून्यावर बाद झालेला कर्णधार धोनीसुद्धा मोठी खेळी खेळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल. तीन वेळचा विजेता चैन्नईचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल त्यामुळे पंजाब साठी हा सामना सोपा नक्कीच नसेल.

अटितटीच्या सामन्यांत विजय मिळवत पंजाबने विजयी सुरुवात केली आहे पण त्यांच्या फलंदाजीची मदार पुर्णपणे कर्णधार के एल राहुलवर दिसते. पहिल्या सामन्यांत दिपक हुड्डाच्या तडाखेबाज खेळीने संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यामुळे मयंक आगरवाल, ख्रिस गेल सुद्धा मोठी खेळी खेळण्यास आतुर असेल. पहिल्या सामन्यांत ९ धावांनी शतक हुकलेला कर्णधार राहुल सुद्धा आपली लय कायम ठेवण्यास उत्सुक असेल.प गोलंदाजीची मदार असेल ती मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग, जाय रिचर्डसनवर असेल. पहिल्या सामन्यांत अपयशी ठरलेल्या मुर्गन अश्विनच्या जागी युवा बिश्नोईला संघात स्थान मिळु शकते.

पंजाब किंग्स – के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, दिपक हुड्डा, शाहरुख खान, मोहम्मद शमी, मेरिडीथ, अर्शदिप सिंग, जाय रिचर्डसन, रवि बिश्नोई

चैन्नई सुपर किंग्स – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस,मोईन अली, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/सॅम करन, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: