डेविड मिलर (६२) आणि ख्रिस मॉरिसच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानचा दिल्लीवर ३ गडी राखुन विजय

रिषभ पंतने कर्णधारपदाच्या आपल्या पहिल्याच सामन्यांत चैन्नई सुपर किंगवर विजय मिळवत आयपीएल २०२१ ची विजयी सुरुवात केली होती तर दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन आपल्या शतकी खेळीनंतरही संघाला विजय मिळवुन देऊ शकला नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ आपला आयपीएल २०२१ मधील पहिला-वहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे दिल्लीचा संघ विजयी लय कायम ठेवण्यास आतुर होता. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसमने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. राजस्थानने संघात दोन बदल करत बेन स्टोक्स व श्रेयस गोपालच्या अनुक्रमे डेविड मिलर आणि जयदेव उनाडकटला तर दिल्ली कडुन शिमरॉन हेटमायर व अमित मिश्राच्या जागी कागिसो रबाडा व ललित यादवला संघात संधी देण्यात आली होती.

पहिल्या सामन्यांत शानदार खेळी केलेल्या शिखर धवन व पृथ्वी शॉकडुन चांगल्या सलामीची दिल्लीला अपेक्षा होती पण या सत्रातला पहिला सामना खेळणाऱ्या जयदेव उनाडकटने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत दिल्लीची अवस्था २ बाद ९ केली होती. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने शानदार सुरुवात केली होती त्यातच उनाडकटने रहाणेला बाद करत दिल्लीला तीसरा झटका दिला होता. उनाडकटनंतर मुस्तफिजुर रहेमानने स्टॉयनिसला माघारी धाडत दिल्लीची अवस्था ६.५ षटकांत ४ बाद ३७ केली होती. ७ षटकांत ४ गडी गमावल्यामुळे दिल्लीचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता आणि डाव सांभाळण्याची जिम्मेदारी होती ती कर्णधार रिषभ पंतवर.

रिषभ आपल्या नेहमीच्या अंदाजातच खेळत होता. रिषभने ११ व्या षटकांत तेवातियाच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत चार चौकारांच्या सहाय्याने २० धावा काढत धावसंख्येला वेग दिला होता.पुढच्याच षटकांत रिषभने आपले अर्धशतक साजरे केले होते. दिल्लीसाठी रिषभने मैदानावर टिकुन राहाणे आवश्यक होते पण रियान परागच्या थेट फेकीवर रिषभला ५१ धावांवर माघारी धाडले होते. शेवटी टॉम करन व ख्रिस वोक्सच्या योगदानाने दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकांत १४७ धावांपर्यंत पोहचला होता. राजस्थानकडुन उनडकटने ३, मुस्तफिजुर रहेमानने २ तर मॉरिसने १ गडी बाद केला होता.

१४८ धावांचे आव्हान मोठे नव्हते पण राजस्थानने सावध सुरुवात करणे आवश्यक होते.मनन वोहराने दोन शानदार चौकार मारत लयीत असल्याचे दाखवले होते पण त्यानंतर पुढील ६ चेंडूत ३ गडी गमावल्यामुळे राजस्थानची अवस्था ३ बाद १७ झाली होती. शिवम दुबे दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चाचपडत होता आणि आयपीएल २०२१ मधील पहिला सामना खेळणारा डेविड मिलरने चांगली सुरुवात केली होती. राजस्थानला चांगल्या भागिदारीची आवश्यकता होती पण शिवम दुबे पाठोपाठ रियान पराग माघारी परतल्याने राजस्थानची अवस्था ९.२ षटकांत ५ बाद ४२ झाली होती.

पहिल्या १० षटकांत ५ गडी बाद करत दिल्लीने सामन्यांवर पकड मिळवली होती. मिलर व तेवातिया डाव हळुहळु पुढे नेत होते. मिलर व तेवातियाची भागिदारी दिल्लीसाठी धोकादायक ठरताना दिसत होती त्यातच आधी रबाडाने तेवातियाला तर आवेश खानने मिलरला बाद करत सामना दिल्लीकडे झुकवला होता. मिलर बाद झाला तेव्हा राजस्थानला विजयासाठी २५ चेंडूत ४४ धावांची आवश्यकता होती. मिलरच्या जागी मैदानात आलेल्या उनाडकटने वोक्सच्या गोलंदाजीवर शानदार षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले होते. शेवटच्या दोन षटकांत २७ धावांची आवश्यकता असताना ख्रिस मॉरिसने रबाडाच्या गोलंदाजीवर दोन षटकारांसह १५ धावा वसुल करत सामन्यांत रंगत आणली होती. १८ व्या षटकांत शानदार गोलंदाजी केलेल्या टॉम करनवर शेवटच्या षटकाची मदार होती पण ख्रिस मॉरिस मात्र वेगळ्याच लयीत दिसत होता.२० व्या षटकांतील पहिल्या ४ चेंडूत दोन षटकारांसह १४ धावा वसुल करत संघाला आयपीएल २०२१ मधील पहिला विजय मिळवुन दिला.शेवटी मिलर ३६ तर उनाडकट ११ धावांवर नाबाद राहिले. राजस्थानकडुन डेविड मिलरने सर्वाधिक ६२ धावा केल्या तर दिल्ली कडुन आवेश खानने ३, ख्रिस वोक्स व रबाडाने प्रत्येकी २ गडी बाद केले. राजस्थानकडुन १५ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या जयदेव उनाडकटला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: