दिपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखुन विजय

पंजाब किंग्सने आपल्या पहिल्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा अटितटीच्या सामन्यांत पराभव केल्याने पंजाब संघाचा आत्मविश्वास उचांवला होता तर दुसरीकडे दिल्ली कडुन ७ गडी राखुन पराभव झाल्याने चेन्नईचा संघ आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता. दोन्ही संघाचा विचार करता अनुभवात चेन्नईचा संघ काहीसा सरस वाटत होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंगसाठी आपला २०० वा सामना खेळता होता. धोनीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाना मागील सामन्यांतील संघच कामय ठेवले होते.

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरत दिपक चहरने मयंक आगरवालला पहिल्याच षटकांत शून्यावर त्रिफळाचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात के एल राहुल रविंद्र जडेजाच्या थेट फेकीवर धावबाद झाला होता. पहिल्या तीन षटकांत दोन्ही सलामीवीर परतल्याने पंजाबचा संघ काहीसा दबावात आला होता. त्यातच पाचव्या षटकांत चहरने गेल आणि पुरनला बाद करत पंजाबचे कंबरडेच मोडले होते.महत्त्वाचे चार फलंदाज पहिल्या पाच षटकांत परतल्याने डाव सांभाळण्याची जिम्मेदारी आली होती ती पहिल्या सामन्यांत आतषी खेळी केलेल्या दिपक हुड्डा आणि युवा फलंदाज शाहरुख खानवर. पण चहरने हुड्डाला बाद करत पंजाबची अवस्था ५ बाद २६ केली होती. आयपीएल मधील आपला दुसराच सामना खेळणाऱ्या शाहरुख खान शानदार फटके खेळत होता पण दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. युवा शाहरुख खानने छोट्या छोट्या भागीदारीकरत संघाला संघाला १०० धावांचा टप्पा पार करुन दिला आणि निर्धारित २० षटकांत पंजाबचा संघ ८ गडी गमवत फक्त १०६ धावांपर्यंत पोहचु शकला होता. पंजाबकडुन शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावा केल्या होत्या तर चेन्नईकडुन दिपक चहरने ४ तर सॅम करन, ड्वेन ब्राव्हो आणि मोईन अलीने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीने चेन्नईने सामन्यांवर पकड मिळवली होती त्यामुळे चेन्नईचा संघ सहज सामना सहज जिंकेल असेच दिसत होता.पहिल्या सामन्यांत अपयशी ठरलेला ऋतुराज गायकवाड आज सुद्धा चाचपडत होता शेवटी अर्शदिपच्या गोलंदाजीवर पुल खेळण्याच्या प्रयत्नात ऋतुराज माघारी परतला होता.त्यानंतर मैदानात आलेला मोईन अली मागील सामन्यांतील खेळीलाच पुढे नेत होता असे वाटत होता तर दुसरीकडे फाफ ड्युप्लेसिसने सावध पवित्राच घेतला होता. मोईन अली आपल्या अर्धशतकाजवळ होता पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अली (४६) डीप मिडविकेटला उभ्या असलेल्या शाहरुख खानकडे झेल देऊन माघारी परतला होता. त्यानंतर रैना आणि रायडु झटपट माघारी परतला होते शेवटी सॅम करनने १६ व्या षटकांत चौकार मारत चेन्नईने पंजाबचा ६ गड्यांनी पराभव करत आयपीएल २०२१ मधील पहिला विजय मिळवला. फाफ ड्यु प्लेसिस ३६ तर सॅम करन ५ धावांवर नाबाद राहिले. पंजाबकडुन मोहम्मद शमीने ३ तर अर्शदिप सिंग आणि मुर्गन अश्विनने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत १३ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या दिपक चहरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.  

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: