मुंबई समोर वार्नरच्या सनरायझर्स संघाचे आव्हान

पहिल्या दोन्ही सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायर्झस हैद्राबादचा संघ चांगल्या स्थितीत होता पण त्या स्थितीतुन हैद्राबादला पराभव स्विकारावा लागला होता. मागच्या सामन्यांत तर शहाबाझ अहमदच्या एका षटकाने सामन्याला कलाटणी दिली होती. चेन्नईच्या खेळपट्टीवर जम बसलेल्या खेळाडुने टिकुन राहणे महत्वाचे होते पण नेमका तिथेच हैद्राबादचा संघ मागे राहिला होता. दोन्ही सामन्यांत मनिष पांडेनी चांगल्या खेळी केल्या पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.तर दुसरीकडे मुंबईने दोन पैकी एक सामन्यात विजय मिळवला आहे आणि दोन्ही सामन्यांत मुंबईने प्रथम फलंदाजी केली आहे.मुंबईचा संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल तर हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असेल.

मुंबई संघाचा विचार करता फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या इशान किशन आणि किरॉन पोलार्डवर असेल.पहिल्या दोन सामन्यांत सुर्यकुमार यादव व रोहित शर्माने महत्त्वाचे योगदान दिले आहे पण या दोघांबरोबर हार्दिक, इशान आणि पोलार्ड मोठी खेळी खेळण्यास उत्सुक असतील.गोलंदाजीत राहुल चहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्टवर मोठी जिम्मेदारी असेल. कोलकत्त्याविरुद्धच्या विजयात राहुल चहरच्या शानदार कामगिरीने सामन्याला कलाटणी दिली होती आणि त्यात कृणाल पंड्या, बोल्ट व बुमराहचे योगदान महत्त्वाचे होते. राशिद खानसमोर मुंबईचे फलंदाज कशी करतात यावर सामन्यांचे चित्र स्पष्ट होवु शकतो.

सनरायझर्स हैद्राबाद संघाचा विचार करत संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडेवर असेल तर गोलंदाजीत राशिद खानची चार षटके महत्त्वाची असतील.त्यासोबतच भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजनच्या डेथ ओव्हरर्स महत्त्वाच्या असतील.पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या वृद्धीमान साहाच्या जागी गोस्वामीला संघात संधी मिळू शकते.जेसन होल्डरच्या येण्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीत ताकद वाढली आहे.पहिल्या दोन सामन्यांत संघाचा डाव सांभाळणाऱा मनिष पांडे मोठी खेळी खेळण्यासोबतच संघाला विजय मिळवून देण्यास उत्सुक असेल. सामन्यांत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असणार आहे.चेन्नईत झालेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत संघाला लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले आहे त्यामुळे दोन्ही संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतात. दोन्ही संघात दर्जेदार गोलंदाजांचा भरणा आहे त्यामुळे दोन्ही संघाच्या फलंदाजांची आज परीक्षा असणार हे मात्र नक्की.

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, मार्को जेन्सन

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा, टी नटराजन, शादाब नदिम

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: