गोलंदाजीच्या बळावर मुंबईचा सलग दुसरा विजय, पोलार्ड ठरला सामनावीर

आयपीएल २०२१ च्या पहिल्या दोन सामन्यांत विजयाची संधी असताना दोन्ही सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादने संधी गमावली होती त्यामुळे हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या-वहिल्या विजयाच्या शोधात होता तर कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयाने मुंबई इंडियन्स संघाचा आत्मविश्वास वाढला असेल त्यामुळे सामना रंगतदार होणार यांत शंका नव्हती. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने संघात एकमेव बदल करत मार्को जेन्सेनच्या जागी मिल्नेला तर हैद्राबादने जेसन होल्डर, शादाब नदिम, वद्धिमान साहा आणि टी नटराजनच्या जागी मुजीब उर रहेमान, अभिषेक शर्मा, विराट सिंग आणि खलील अहमदला संघात संधी देण्यात आली होती.

चेन्नईत झालेल्या मागील काही सामन्यांत पॉवर प्ले मधील कामगिरी महत्त्वाची ठरते त्यामुळे सुरुवातीपासुनच कर्णधार रोहित शर्माने हैद्राबादच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला होता.रोहितचा आक्रमक पवित्रा पाहता क्विंटन डी कॉकने सावध पवित्रा घेतला होता. रोहित चांगल्या लयीत दिसत होता. मुंबईने पहिल्या ६ षटकांत बिनबाद ५३ अशी धडाकेबाज सुरुवात केली होती. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने आपल्या पहिल्याच षटकांत रोहित शर्माला ३२ धावांवर बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला होता त्यानंतर सुर्यकुमार यादव सुद्धा झटपट माघारी परतला होता.झटपट दोन गडी गमावल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. क्विंटन डी कॉक आणि इशान किशन चाचपडतच खेळत होते. मुंबईसाठी सहजासहजी धावा मिळत नव्हत्या. पहिल्या दोन सामन्यांत फंलदाजीत अपयशी ठरलेल्या किरॉन पोलार्डने सुरुवातीला आपला वेळ घेतल्यानंतर पोलार्डने २२ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करत संघाला निर्धारित २० षटकांत १५० धावांपर्यंत पोहचवले होते.मुंबईकडुन क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या तर हैद्राबादकडुन विजय शंकर व मुजीब उर रहेमानने प्रत्येकी २ गडी बाद केले होते.

हैद्राबादसमोर १५१ धावांचे लक्ष्य होते पण लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते.धावांते यशस्वी पाठलाग करण्यासाठी हैद्राबादला पॉवर प्ले मध्ये शानदार प्रदर्शनाची आवश्यकता होती. आयपीएल २०२१ मध्ये पहिल्यांदाच जॉनी बेअरस्टो कर्णधार डेविड वॉर्नरसोबत सलामीला आला होता.पहिली दोन षटके सावध खेळुन काढल्यानंतर बेअरस्टोने बोल्ट आणि मिल्नेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत संघाला धडाक्यात सुरुवात करुन दिली होती. बेअरस्टो वेगळ्याच मुड मध्ये दिसत होता त्यामुळे वॉर्नरने एक बाजू लावुन धरली होती. ८ व्या षटकांत कृणाल पंड्याच्या चेंडूला बॅक फुटवर खेळण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो हीट विकेटने बाद झाला आणि मुंबईला पहिले यश मिळाले.त्यानंतर पुढच्याच षटकांत राहुल चहरने मनिष पांडेला बाद करत हैद्राबादला दुसरा धक्का दिला होता.बिनबाद ६७ वरुन हैद्राबादची अवस्था ९ षटकांत २ बाद ७१ झाली होती.

दोन झटपट गडी गमावल्यामुळे कर्णधार वॉर्नरवर मोठी जिम्मेदारी आली होती.आवश्यक धावगती हैद्राबादने राखली होती त्यातच एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वॉर्नरला आपल्या थेट फेकीने बाद करत हार्दिक पंड्याने आपले योगदान दिले होते.वॉर्नर बाद करत मुंबईने सामन्यांवर पकड मिळवली होती.कम अनुभुवी खेळाडुंकडुन हैद्राबादला चमत्काराची अपेक्षा होती. चहरने एकाच षटकांत विराट सिंग आणि अभिषेक शर्माला बाद करत हैद्राबादची अवस्था १५ षटकांत ५ बाद १०४ केली होती. शेवटच्या ५ षटकांत हैद्राबादला ४७ धावांची आवश्यकता होती आणि जिम्मेदारी होती ती विजय शंकर आणि अब्दुल समदवर. कृणाल पंड्याने टाकलेल्या १६ व्या षटकांत दोन षटकारांसह १६ धावा वसुल करत विजय शंकरने आपले इरादे स्पष्ट केले होते पण जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्टच्या शानदार गोलंदाजीसमोर हैद्राबादचा संघ १३७ धावांत संपुष्टात आला आणि सलग दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली आहे.हैद्राबादकडुन बेअरस्टोने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर मुंबईकडुन राहुल चहर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी ३ तर बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ गडी बाद केला. मुंबईकडुन २२ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी खेळणाऱ्या किरॉन पोलार्डला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: