बेंगलोर विजयाची हॅटट्रिक साधणार की कोलकत्ता विजयी पथावर परतणार?

बेंगलोर व कोलकत्ता संघाने आयपीएल २०२१ च्या सत्राची विजयी सुरुवात केली होती. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर विजय मिळवत बेंगलोरने सलग दुसरा विजय मिळवला होता तर ३० चेंडूत ३१ धावांची आवश्यकता आसताना कोलकत्ता संघाला मुंबई विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. बेंगलोर सत्रातील एकमेव अपराजीत संघ आहे त्यामुळे बेंगलोरचा संघ आपली विजय लय कायम राखण्यास तसेच कोलकत्ताचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. सामना दुपारी खेळवण्यात येत असल्याने दोन्ही संघाला समान संधी मिळू शकते.

बेंगलोर संघाचा विचार करता पहिल्या दोन्ही सामन्यांत महत्त्वाच्या क्षणी गोलंदाज व फलंदाजांनी योगदान दिले आहे. दुसऱ्या सामन्यांत एकीकडे गडी बाद होत असताना मॅक्सवेल केलेली खेळी महत्त्वपुर्ण होती. बेंगलोरच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल तर कर्णधार विराट कोहली, ए बी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पाडिकलवर तर गोलंदाजीची मदार असेल ती हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहलवर. पहिल्या दोन सामन्यांत सपशेल अपयशी ठरलेला यजुवेंद्र चहल शानदार कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.डॅनियल ख्रिश्चियनच्या जागी डॅनियल सॅम्सला संघात संधी मिळू शकते.

पहिल्या सामन्यांत शानदार कामगिरी केल्यानंतर मुंबईविरुद्धच्या सामन्यांत देखिल ३५ षटकांपर्य़त कोलकत्त्याचे सामन्यांत वर्चस्व होते पण शेवटच्या ५ षटकांत फलंदाजांच्या हाराकिरीमुळए संघाला पराभव स्विकारावा लागला होता. कोलकत्त्याच्या फलंदाजीची मदार असेल ती नितीश राणा, शुभमन गिल, दिनेश कार्तिक आंद्रे रसेल आणि इयॉन मॉर्गनवर तर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, वरुन चक्रवर्ती, आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसनवर. पहिल्या दोन्ही सामन्यांत गोलंदाजीत शानदार कामगिरी करणारा आंद्रे रसेल फलंदाजीत आपले योगदान देण्यास उत्सुक असेल.

संभावित संघ:

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महम्मद अझरुद्दिन, डॅनियल ख्रिश्चियन/डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, काईल जेमिसन

कोलकत्ता नाईट रायजर्स – इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन/सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, हरभजन सिंग/संदिप वॉरियर

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: