अनुभवी चेन्नईचा संघ राजस्थानवर भारी पडेल का?

पहिल्या सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि पंजाबविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर चेन्नई आणि राजस्थानने पंजाब आणि दिल्लीविरुद्ध विजय मिळवत आपले आयपीएल २०२१ मध्ये गुणांचे खाते उघडे होते.त्यामुळे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. आयपीएल २०२० मध्ये चैन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सकडुन दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे राजस्थान चैन्नईविरुद्धची आपली विजयी लय कायम ठेवतो का ते पाहावे लागेल.

चेन्नई संघाचा विचार करता पंजाब विरुद्धच्या सामन्यांत दिपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईने विजय मिळवला होता.चेन्नईने विजय मिळवला असला तरी ऋतुराज गायकवाड पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला आहे त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी रॉबिन उथप्पाला संघात संधी मिळू शकते तसेच सध्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येत असलेला ड्यु प्लेसिससोबत सलामीला आला तर आश्चर्य वाटायला नको. सुरेश रैना, मोईन अली आणि फाफ ड्यु प्लेसिस चांगल्या लयीत दिसत आहे हि चैन्नईसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाजीची धुरा दिपक चहर, शार्दुल ठाकुर, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्होवर असेल.

डेविड मिलर आणि त्यानंतर ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने आपला पहिला विजय साजरा केला पण बेन स्टोक्सच्या अनुपस्थिती संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी अनुभवी कर्णधार संजु सॅमसन, जोस बटलरन आणि डेविड मिलरवर असेल. पहिल्या दोन सामन्यांत पुर्णपणे अपयशी ठरलेल्या मनन वोहरा आणि शिवम दुबेकडुन संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.मनन वोहराच्या जागी यशस्वी जैस्वालला सलामीला खेळाण्याची संधी मिळाली तर फलंदाजी आणखीन मजबुत होवु शकते. मागच्या सामन्यांत शानदार गोलंदाजी केलेल्या जयदेव उनाडकट आणि मुस्तफिजुर रहेमानकडुन पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरीची संघाला अपेक्षा असेल.

संभावित संघ

चेन्नई सुपर किंग्स – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस, मोईन अली, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, ड्वेन ब्राव्हो

राजस्थान रॉयल्स – संजु सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहेमान, चेतन सकारीया

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: