आयपीएल २०२० चा विजेता मुंबई समोर उपविजेता दिल्लीचे आव्हान

आयपीएल २०२० चा विजेता मुंबईचा संघ आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२१ मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तीन सामन्यांत प्रत्येकी दोन सामने जिंकत दिल्ली आणि मुंबईचे दोन्ही संघ लयीत दिसत आहेत. एकीकडे दिल्लीने आपले दोन्ही सामने फलंदाजीच्या बळावर तर मुंबईने गोलंदाजीच्या बळावर जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीने आपले पहिले तीन सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळले आहे. आजचा सामना चेन्नईच्या एम चिदमबरम मैदानावर खेळवण्यात येणार आहे आणि मुंबईने आपले सर्व सामने चेन्नईत खेळले आहेत त्यामुळे आजच्या सामन्यांत मुंबईचे पारडे जड असेल.तसेच नाणेफेकीचा कौल देखिल महत्त्वपुर्ण असेल.

दिल्ली संघाचा विचार करता दिल्लीने दोन्ही सामन्यांत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना सामने जिंकले आहेत त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल हो मात्र नक्की. फिरकीच अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर शिखर धवन, स्टिव्ह स्मिथ आणि रिषभ पंतची कामगिरी संघासाठी महत्त्वाची असेल. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनवर मोठी जबाबदारी असेल.खेळपट्टी फिरकीस अनुकुल असल्याने मागच्या सामन्यांत पदार्पण करणाऱ्या लुकमान मेरिवालाच्या जागी लेग स्पिनर अमित मिश्राला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. चेन्नईच्या खेळपट्टीवर पॉवर प्ले महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे शिखर धवन आणि पृथ्वी शॉ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

सुरुवातीच्या सामन्यांत अपयशी ठरलेल्या किरॉन पोलार्ड आणि क्विंटन डी कॉकने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध सामन्यांत महत्त्वाचे योगदान दिले होते तश्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास दोघेही उत्सुक असतील. या दोघांसोबतच मुंबईच्या फलंदाजीची धुरा असेल ती कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यावर तर गोलंदाजीची मदार असेल ती जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कृणाल पंड्यावर. मागील दोन्ही सामन्यांत गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर मुंबईने विजय खेचुन आणला त्यामुळे यासामन्यांत सुद्धा तशीचा कामगिरी करण्यास रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडिय्नसचा संघ उत्सुक असेल.

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्हन स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, आवेश खान

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, मिल्ने/जयंत यादव

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: