मोईन अली आणि रविंद्र जडेजाच्या फिरकी समोर राजस्थानचे लोटांगण, मोईन अली ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सने आपल्या दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत आयपीएल २०२१ मधील गुणांचे खाते उघडले. आता दोन्ही संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार होते. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांनी आपल्या मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता.

प्रथम फलंदाजीस आलेल्या सलामीवीर फाफ ड्यु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती.खराब फॉर्ममध्ये असलेल्या गायकवाडला पहिल्याच चेंडूवर तेवाटियाने जिवनदान दिले होते पण तो या जीवनदानाचा फायदा उठवु शकला नाही आणि चौथ्या षटकांत शिवम दुबे कडे झेल देऊन परतला होता. ड्यु प्लेसिस चांगल्या लयीत दिसत होता पाचव्या षटकांत उनाडकटने टाकलेल्या षटकांत ड्यु प्लेसिसने जोरदार हल्ला चढवत तब्बल १९ धावा वसुल करत धावसंख्येला वेग दिला होता पण पुढच्याच षटकांत ड्यु प्लेसिस ३३ धावा काढुन माघारी परतला होता. ५.४ षटकांत २ बाद ४५ अश्या स्थितीत चेन्नईचा संघ होता त्यामुळे मोईन अली आणि सुरेश रैनावर मोठी जिम्मेदारी होती. मोईन अलीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता पण जम बसल्यानंतर तो सुद्धा ड्यु प्लेसिसप्रमाणे माघारी परतला होता.  

चेन्नईला मोठ्या धावसंख्येजवळ पोहचण्यासाठी चांगल्या भागिदारीची आवश्यकता होती. रैना आणि रायडुच्या जोडीने तीन षटकांत ३८ धावा वसुल करत धावसंख्येला वेग दिला होता आणि रैना-रायडुची भागिदारी राजस्थानसाठी धोकादायक ठरताना दिसत होती. चेन्नईचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करताना दिसत होता पण युवा गोलंदाज चेतन साकारीयाने १४ व्या षटकांत रायडु आणि रैनाला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला होता त्यावेळेस चेन्नईने १५ षटकांत ५ गडी गमवत १२५ धावा केल्या होत्या. शेवटच्या ५ षटकांत फटकेबाजी करण्याची जबाबदारी आली होती ती जडेजा आणि धोनीवर. शेवटी ड्वेन ब्राव्हो, धोनी आणि सॅम करनच्या योगदानामुळे चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकांत १८८ धावांपर्यंत पोहचला होता.राजस्थानकडुन चेतन साकरियाने ३, ख्रिस मॉरिसने २ गडी बाद केले होते.

१८९ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी राजस्थानला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पण एक-दोन शानदार फटके खेळुन मनन वोहरा माघारी परतला होता आणि वोहरा पाठोपाठ सॅमसन सुद्धा बाद झाला होता.५.५ षटकांत राजस्थानची स्थिती २ बाद ४५ झाली होती.राजस्थानने आवश्यक धावगती राखली होती.झटपट दोन गडी गमावल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला होता त्यामुळे राजस्थानला चांगल्या भागिदारीची आवश्यकता होती. एकीकडे बटलर चांगल्या लयीत दिसत होता तर शिवम दुबे चाचपडतच खेळत होता. ११ षटकांत राजस्थानने २ गडी गमवत ८७ धावांपर्यंत मजल मारली होती आणि बटलर सुदधा आपल्या अर्धशतकाजवळ होता.

१२ व्या षटकांत रविंद्र जडेजाने एका शानदार चेंडूवर बटलरला त्रिफळाचीत करत राजस्थानला मोठा धक्का दिला होता. त्याच षटकांतील शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेला पायचित करत राजस्थानची अवस्था ४ बाद ९० केली होती त्यानंतर मोईन अलीच्या गोलंदाजीसमोर राजस्थानची अवस्था १५ षटकांत ७ गडी गमवत ९७ झाली होती आणि सामन्यांवर चेन्नईने पुर्णपणे पकड मिळवली होती. जयदेव उनाडकट (२४) आणि राहुल तेवाटिया (२०) ने पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला शेवटी चेन्नईने राजस्थानवर ४५ धावांनी विजय मिळवत सलग दुसरा विजयासह चेन्नईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थानकडुन जोस बटलरने सर्वाधिक ४९ धावा केल्या तर चेन्नईकडुन मोईन अलीने ३, रविंद्र जडेजा व सॅम करनने प्रत्येकी २ तर ब्राव्हो व शार्दुल ठाकुने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत २६ धावा आणि ७ धावांत ३ गडी अशी अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या मोईन अलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: