दिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखुन विजय, २४ धावांत ४ गडी बाद करणारा अमित मिश्रा ठरला सामनावीर

आयपीएल २०२० चा विजेता मुंबई आणि उपविजेता दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ मध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी पहिल्या तीन सामन्यांत प्रत्येकी दोन विजय मिळवल्यामुळे हा सामना जबरदस्त होणार यात शंका नव्हती. मुंबईचा संघ आपला चौथा सामना चेन्नई मध्ये खेळत असल्याने सामन्यांवर मुंबईचे वर्चस्व असेल असे वाटत होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने संघात एक बदल करत मिल्नेच्या जागी जयंत यादवला तर दिल्लीने ख्रिस वोक्स व मेरिवालाच्या जागी हेटमायर व अमित मिश्राला संघात स्थान दिले होते.

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबईला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मागील दोन सामन्यांत अपयशी ठरलेला डी कॉक तीसऱ्याच षटकांत माघारी परतला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवने मोठे फटके खेळत आपले इरादे स्पष्ट केले होते.दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. ६ षटकांत १ बाद ५५ मुंबईसाठी शानदार सुरुवात होती पण पुढच्याच षटकांत आवेश खानने सुर्य़कुमारला बाद करत धोकादायक वाटणारी भागिदारी तोडली होती. रोहित शर्मा मैदानावर टिकुन होता हि मुंबईसाठी जमेची बाजू होती. ९ व्या षटकांत अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा ४४ धावांवर बाद झाला आणि मुंबईला तीसरा झटका बसला होता. रोहित पाठोपाठ त्याच षटकांत हार्दिक माघारी परतला होता.

१ बाद ६७ वरुन मुंबईची अवस्था ४ बाद ७७ झाली होती त्यामुळे इशान किशन, पोलार्ड आणि कृणाल पंड्यावर मोठी जिम्मेदारी होती. ललित यादवने कृणाल पंड्याला तर आमित मिश्राने आपल्या गुगलीने पोलार्डला बाद करत मुंबईची अवस्था १२ षटकांत ८४ केली होती. शेवटी इशान किशन (२६) आणि जयंत यादव (२३) च्या ४९ धावांच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमवत १३७ धावांपर्य़ंत मजल मारली होती. मुंबईकडुन कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावा केल्या होत्या तर दिल्लीकडुन अमित मिश्राने ४, आवेश खानने २ तर ललित यादव, मार्कस स्टॉयनिस आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.

एका चांगल्या सुरुवातीनंतर गोलंदाजांनी मुंबईला १३७ धावांत रोखत सामन्यांत दिल्लीने सामन्यांवर काहीश पकड मिळवली होती पण पकड मजबुत करण्यासाठी दिल्लीला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. मिल्नेच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जयंत यादवने आपल्या पहिल्याच षटकांत पृथ्वी शॉला बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले होते. परंतु त्यानंतर स्मिथ आणि धवनने आततायी फटके न खेळता धावफलक हलता ठेवला होता. स्मिथ आणि धवनची जोडीने आवश्यक धावगती राखली होती. स्मिथ आणि धवनची भागिदारी मुंबईसाठी धोकादायक ठरताना दिसत होती त्यातच कायरॉन पोलार्डने आपल्या पहिल्याच षटकांत स्मिथला पायचित करत संघाला मोठे यश मिळवून दिले होते.

स्मिथ बाद झाला तेव्हा दिल्लीला विजयासाठी १०.४ षटकांत ७४ धावांची आवश्यकता होती. मैदानावर टिकुन राहीलेला शिखर धवन दिल्लीसाठी जमेची बाजू होती. स्मिथ बाद झाल्यानंतर पंतच्या जागी ललित यादव मैदानात आला होता. धवन आणि यादवने कोणताही दबाव न घेता धावफलक हलता ठेवला होता पण चहरने धवनला आणि बुमराहने पंतला बाद करत सामन्यांत रंगत आणली होती पण शेवटी ललित यादव (नाबाद २२) आणि हेटमायर (नाबाद१४) चाया जोडीने २० षटकांत संघाला ६ गडी राखुन विजय मिळवून देत संघाला ६ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून दिले आहे. दिल्लीकडुन सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा केल्या तर मुंबईकडुन पोलार्ड, जयंत यादव, बुमराह आणि राहुल चहरने प्रत्येकी १ गडी बाद केला.दिल्लीकडुन २४ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: