पंजाबचा संघ विजयी पथावर परतणार की हैद्राबाद साजरा करणार आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय?

गुणतालिकेत शेवटच्या दोन क्रमांकावर असलेले पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करणारा हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर सलग दोन सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. मागील काही सत्रात पंजाबची गोलंदाजी कमजोरी राहीली आहे. रिचर्डसन आणि मेरिडीथला संघात सामील करुन घेत गोलंदाजीत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे पण मागील तीन सामन्यांत ते सपशेप अपयशी ठरले आहेत.

सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होणार असल्याने दोन्ही संघांना समान संधी मिळू शकते.पंजाब संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार के एल राहुल, मयंक आगरवाल, ख्रिस गेल, दिपक हुड्डा आणि निकोलस पुरनवर.मागील सामन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास मयंक आगरवाल उत्सुक असेल. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर के एल राहुलचा स्ट्राईक रेट संघासाठी काहीसा अडचणीचा ठरत आहे. मागील तीन सामन्यांत सपशेल अपयशी ठरलेला निकोलस पुरन आपले योगदान देण्यास उत्सुक असेल.संघाच्या गोलंदाजीची मदार असेल ती मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, रिचर्डसन आणि रवि बिश्नोईवर असेल.

तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत दोन सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादचा संघ विजयासमीप होता पण त्यांना महत्त्वाच्या क्षणी आपली कामगिरी उंचावण्यात अपयश आले. हैद्राबादसाठी संघाची मधली फळी अडचणीची ठरताना दिसत आहे त्यामुळे कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोवर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. संघाला मनिष पांडेकडुनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शानदार लयीत दिसलेला भुवनेश्वर कुमार पहिल्या तीन सामन्यांत आपल्या नेहमीच्या लयीत दिसलेला नाही त्यामुळे गोलंदाजीची धुरा असेल ती राशिद खानवर. चेन्नईच्या खेळपट्टीवर सिद्धार्थ कौलची गोलंदाजी हैद्राबादसाठी महत्त्वाची ठरु शकते.

संभावित संघ:-

पंजाब किंग्स – के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, दिपक हुड्डा, शाहरुख खान, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदिप सिंग, जाय रिचर्डसन, रवि बिश्नोई

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा/सिद्धार्थ कौल, टी नटराजन, शादाब नदिम

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: