पडिकल आणि कोहलीच्या भागिदारीच्या बळावर बेंगलोरचा विजयाचा चौकार, शतकवीर पाडिकल ठरला सामनावीर

पहिल्या तीन सामन्यांत फक्ता एक विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान होते ते गुणातालिकेत दुसऱ्या आणि आयपीएल २०२१ मधील एकमेव अपराजित संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे. राजस्थानसाठी सामना सोपा नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ बेंगलोरचा विजयी रथ रोखतो का याकडे सर्वांते लक्ष्य होते. राजस्थानसमोर फॉर्म मध्ये असलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डीव्हिलियर्सचे आव्हान होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानने संघात एक बदल करत जयदेव उनाडकटच्या जागी श्रेयस गोपालला तर बेंगलोरने रजत पाटिदारच्या जागी केन रिचर्डसनला संघात संधी दिली होती.

बेंगलोर सारख्या संघासमोर मोठे लक्ष्य ठेवण्यासाठी राजस्थानला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण पहिल्या ५ षटकांत १८ धावांत ३ गड्यांना माघारी धाडत बेंगलोरने राजस्थानला बॅकफुटवर टाकले होते.झटपट ३ गडी गमावल्यामुळे डाव सांभाळण्याची जबाबदारी आली होती ती कर्णधार संजु सॅमसन आणि शिवम दुबेवर. एक-दोन जबरदस्त फटके खेळल्यानंतर सॅमसन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. ४३ धावांत ४ गडी बाद करत बेंगलोरने सामन्यांवर पकड मिळवली होती. बेंगलोरचा संघ आपली पकड आणखीन मजबुत करेल असेल दिसत होते पण शिवम दुबे आणि रियान परागने ६.१ षटकांत ६६ धावांची भागिदारी करत १०० धावांचा टप्पा गाठुन दिला होता. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते त्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये त्यांच्याकडुन संघाला फटकेबाजीची अपेक्षा होती पण आधी रियान (२५) आणि नंतर शिवम दुबे (४६) माघारी परतले होते.शेवटी राहुल तेवातियाने २३ चेंडूत ४० धावांची खेळी करत संघाला १७७ धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. ४ बाद ४३ वरुन ९ बाद १७७ राजस्थानसाठी चांगली धावसंख्या होती. बेंगलोरकडुन सिराज आणि हर्षल पटेलने प्रत्येकी ३ तर जेमिसन, केन रिचर्डसन आणि सुंदरने १ गडी बाद केला होता.

राजस्थानने बेंगलोरसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले होते खरे पण बेंगलोरची फलंदाजी पाहता हे आव्हान काही प्रमाणात कमी होते त्यामुळे राजस्थानला पहिल्या ६ षटकांत एक-दोन गडी बाद करण्याची अपेक्षा होती पण पहिल्या षटकांपासुनच बेंगलोरने आक्रमक सुरुवात केली होती. पडिकलच्या आक्रमक पवित्र्यामुळे विराटने सावध पवित्रा घेतला होता. राजस्तानचा कर्णधार गोलंदाजीत बदल करत होता पण त्याला यश मिळत नव्हते. ६ व्या षटकांत बेंगलोरने ५० धावांचा टप्पा पार केला होता. पडिकलने प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला होता. बेंगलोरचा संघ आपल्या चौथ्या विजयाकडे आगेकुच करत होता तर दुसरीकडे राजस्थानचा संघाने जणु आपला पराभव स्विकारला होता. बेंगलोरने १० व्या षटकांत १०० धावांचा टप्पा पार करत सामना सहज जिंकेल असे दिसत होते.

१०० धावांच्या भागिदारीत पडिकलचा वाटा होता तो तब्बल ७९ धावांचा तर कोहलीचा वाटा होता तो २५ धावांचा. पडिकल आणि विराटच्या भागिदारीने सामना एकतर्फी केला होता.धावसंख्या १०० च्या पार गेल्यानंतर विराटने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाने पुढच्या ४ षटकांत ५० धावा वसुल केल्या होत्या. १७ व्या षटकांतील पहिल्याच चेंडूला सीमारेषेपार धाडत देवदत्त पाडिकलने आपले पहिले वहिले आयपीएल शतक झळकावले. यासोबतच देवदत्त पाडिकल आयपीएल मध्ये शतक झळकावणारा तीसरा युवा खेळाडु ठरला. त्याच षटकांत बेंगलोरने राजस्थानवर १० गडी राखुन विजय मिळवत आपला सलग चौथा विजय मिळवत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली आहे. देवदत्त पाडिकल १०१ तर विराट कोहली ७२ धावांवर नाबाद राहिले. ५२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १०१ धावांची खेळी करणाऱ्या देवदत्त पाडिकलला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: