मुंबई इंडियन्स समोर राहुलच्या पंजाब किंग्सचे आव्हान

पहिल्या सामन्यांत राजस्थानविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर पंजाबला सलग तीन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे तर दुसरीकडे मुंबईला सलग दोन विजय मिळवल्यानंतर दिल्ली विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसतील. मुंबईची मधली फळी संघासाठी पराभवाचे मुख्य कारण ठरत आहे. दोन सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय मिळवले आहेत तर नेहमीप्रमाणेच पंजाबची गोलंदाजी आणि कर्णधार के एल राहुल वगळता इतर फलंदाजांचे अपयश संघाला विजयापासुन दुर ठेवत आहेत.

मुंबईचा संघ सलग पाचवा सामना चेन्नईत खेळत आहे त्यामुळे मुंबईला काही प्रमाणात याचा फायदा होवु शकेल. दिल्ली विरुद्धच्या सामन्यांत चांगली सुरुवात केल्यानंतर फलंदाजांनी आपली विकेट फेकली होती त्यामुळे कर्णधार रोहित शर्मावर मोठी जिम्मेदारी असेल त्यामुळे रोहितने एक बाजू चांगली सांभाळुन ठेवली तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळू शकते. पहिल्या चार सामन्यांत हार्दिक पंड्या पुर्णपणे अपयशी ठरला आङे त्यामुळे त्याला संघाच्या विजयात आपले योगदान द्यावे लागेल.मुंबईच्या फलंदाजीची मुख्यत्वे जबाबदारी असेल ती कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्डवर तर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहरवर.

पंजाब संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीची धुरा पुर्णपणे कर्णधार के एल राहुलवर आहे. मयंक आगरवाल, ख्रिस गेल आणि दिपक हुड्डाने या सत्रात चांगल्या खेळी केल्या पण ते आपल्या कामगिरीत सातत्या राखु शकले नाहीत तर दुसरीकडे निकोलस पुरन पुर्णपणे अपयशी ठरला आहे. जाय रिचर्डसन, मेरीडिथ सारख्या गोलंदाजांना पंजाबने संघात सामावुन घेतले खरे पण ते आतापर्यंतच्या सामन्यांत पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. आयपीएल २०२० च्या सत्रात शानदार कामगिरी केलेल्या रवि बिश्नोईला फिरकीस अनुकुल खेळपट्टीवर संघात संधी मिळाली तर ते पंजाबसाठी अनुकुल राहिल. संघाच्या गोलंदाजी धुरा मोहम्मद शमी आणि अर्शदिप सिंगवर असेल.

पंजाब किंग्स – के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, डेविड मलान/ख्रिस गेल, निकोलस पुरन, दिपक हुड्डा, शाहरुख खान, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदिप सिंग, मुर्गन अश्विन, रवि बिश्नोई

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: