मॉर्गन आणि सॅमसनमध्ये कोण ठरणार वरचढ?

गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर असलेले कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आज मुंबईत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी चार सामन्यांत फक्त एका सामन्यांत विजय मिळवता आला आहे. हा दोन्ही संघांचा मुंबईमधील शेवटचा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकुन मुंबईतल्या सत्राचा शेवट गोड करण्यास उत्सुक असतील. दोन्ही संघ आपल्या मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानांवर आहेत.

विजयाने आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात केलेला कोलकत्याचा संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे.नितीश राणाने फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे पण त्याला हवी तशी साथ मिळालेली नाही त्यामुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. गोलंदाजीत सुद्धा आंद्रे रसेल वगळता कोणालाही गोलंदाजीत सातत्य ठेवता आलेले नाही. कोलकत्ता संघाला शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तर गोलंदाजीत पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुन चक्रवर्तीकडुन गोलंदाजीत सातत्य राखावे लागेल.

पहिल्या सामन्यांत शानदार शतक खेळी नंतर राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनला पुढील ३ सामन्यांत फक्त २६ धावा काढता आल्या आहेत आणि हेच राजस्थानसाठी पराभवाचे कारण ठरत आहे. मनन वोहरा, जोस बटलरला अजुनही लय मिळालेली नाही. मनन वोहराच्या जागी यशस्वी जैस्वालला संघात संधी मिळाली तर संघाला चांगली सुरुवात मिळू शकेल. कर्णधार संजु सॅमसनला देखिल सावध सुरुवात करावी लागेल जेणे करुन तो डाव सांभाळु शकतो. गोलंदाजीत चेतन साकारीयाने गोलंदाजीत सातत्य ठेवले आहे पण ख्रिस मॉरीस, जयदेव उनाडकट आणि श्रेयस गोपालला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

राजस्थान रॉयल्स – संजु सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहेमान, चेतन सकारीया

कोलकत्ता नाईट रायजर्स – इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदिप वॉरियर

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: