राहुल आणि गेलच्या शानदार भागिदारीच्या बळावर पंजाबचा मुंबईवर ९ गडी राखुन विजय

एकीकडे मुंबईचा संघ दिल्लीविरुद्ध पराभव स्विकारुन मैदानात उतरला होता दुसरीकडे पहिल्या सामन्यांत विजय मिळवल्यानंतर सलग ३ सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक होता.चेन्नईची खेळपट्टीवर फलंदाजांचा कस नक्कीच लागणार होता. पंजाबचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने संघात एकमेव बदल करत मुर्गन अश्विनच्या जागी रवि बिश्नोईला तर मुंबईने मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता.

मुंबईचा सलग पाचव्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करत होता.खराब फॉर्ममध्ये असलेल्या डी कॉकने आज पण निराशच केले. खराब फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनला तीसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती पण तो सुद्धा चाचपडतच खेळत होता. कर्णधार रोहित शर्माने देखिल सावध सुरुवात केली होती. मुंबईला पॉवर प्ले मध्ये फक्त २१ धावा काढता आल्या होत्या. आयपीएल २०२१ मधील आपला पहिला सामना खेळणाऱ्या बिश्नोईने इशानला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला होता. कर्णधार रोहीत शर्मा आणि सुर्यकुमार यादव डाव हळुहळु पुढे नेत होते पण धावगती मात्र ५ च्या आसपास होती. १० व्या षटकांनंतर रोहित आणि सुर्यकुमारने धावगतीस वेग देण्यास सुरुवात केली होती.

रोहित-सुर्यकुमारच्या भागिदारीने मुंबईच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा वाढवल्या होत्या. १४ व्या षटकांत बॅकवर्ड पॉईंटला शानदार चौकार मारत रोहितने आयपीएल २०२१ मधील पहिले अर्धशतक साजरे केले होते.रोहित-सुर्यकुमारची जोडी मुंबईला मोठी धावसंख्या गाठुन देईल असेच दिसत होते पण दोन षटकांत सुर्यकुमार (३३) आणि रोहित शर्मा (६३) ला बाद करत पंजाबने सामन्यांवर पकड मिळवली होती. शेवटी किरॉन पोलार्डने नाबाद १६ धावा करत संघाला निर्धारित २० षटकांत १३१ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पंजाबकडुन मोहम्म्द शमी व बिश्नोईने प्रत्येकी २ तर अर्शदिप सिंग आणि दिपक हुड्डाने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.

तसे पाहिले १३२ धावांचे आव्हान तसे मोठे पण सामन्यांत लढत देण्यापुरते होते पण त्यासाठी मुंबईला पॉवर प्ले मध्ये झटपट गडी बाद करण्याची आवश्कता होती. पंजाबकडुन सलामीला आलेल्या कर्णधार राहुल आणि मयंकने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्ले मध्ये ४५ धावा काढल्या होत्या. १३२ धावांचा पाठलाग करताना बिनबाद ४५ पंजाबसाठी शानदार सुरुवात होती त्यातच चांगल्या लयीत दिसणाऱ्या मयंक आगरवालला २५ धावांवर बाद करत राहुल चहरने मुंबईला पहिले यश मिळवून दिले होते. मयंक बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने दोन्ही बाजूने फिरकी गोलंदाज लावुन राहुल आणि गेलला जखडुन ठेवले होते. गेल जरा चाचपडतच होता त्यामुळे मुंबईला सामन्यांत परतण्याची संधी होती. आवश्यक धावगती ८ च्या आत होती त्यामुळे ३-४ षटके सावध खेळुन काढल्यानंतर दोघांनी धावफलक हलता ठेवला आणि गेलने आक्रमक फटके खेळण्यास सुरुवात केली होती आणि सामना मुंबईच्या हातातुन जाताना दिसत होता. ३ षटकांत १७ धावांची आवश्यकता असताना गेल-राहुलच्या जोडीने ४ चेंडूतच १७ धावा वसुल करत गतविजेता मुंबई इंडियन्सवर ९ गडी राखुन विजय मिळवला. गेल ४३ तर राहुल ६० धावांवर नाबाद राहिले. मुंबईकडुन एकमेव गडी राहुल चहरने बाद केला. कर्णधारास साजेशी नाबाद ६० धावांची खेळी करणाऱ्या राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: