युवा रिषभ पंतसमोर विराट कोहलीचे आव्हान

पहिल्या ५ सामन्यांत प्रत्येकी ४ विजयांसह दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे संघ ८ गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तीसऱ्या क्रमांकावर आहेत.दिल्लीचा संघ सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवून या सामन्यांत उतरणार आहे तर दुसरीकडे बेंगलोरला सलग चार विजयानंतर चेन्नईविरुद्ध ६९ धावांनी पराभव स्विकारावा लागला त्यामुळे दिल्लीचा संघ आपली विजय लय कायम ठेवण्यास उत्सुक असेल तर बेंगलोरचा संघ मागचा पराभव विसरुन विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल त्यामुळे सामना जबरदस्त होणार यात शंका नाही. दोन्ही संघाचा अहमदाबादमधील पहिलाच सामना आहे त्यामुळे दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्यास आतुर असतील.सामना सं.७.३० वा खेळविण्यात येणार असल्याने नाणेफेकिचा कोल महत्त्वाचा असणार आहे.

दिल्ली संघाचा विचार करता शिखर धवन, पृथ्वी शॉ चे कामगिरीतील सातत्य संघासाठी जमेची बाजू आहे.कर्णधार रिषभ पंत आणि स्टिव्ह स्मिथने देखिल आपले योगदान दिले आहे.संघाला मार्कस स्टॉयनिस आणि शिमरॉन हेटमायरकडुन संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. रविचंद्रन अश्विनने काही कारणास्तव आयपीएल २०२१ मधुन माघार घेतली आहे त्यामुळे संघाच्या फिरकी गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती अनुभवी अमित मिश्रा आणि अक्षर पटेलवर तर जलदगती गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती कागिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्खियावर असेल.मागच्या सामन्यांतील संघात हेटमायरच्या जागी नॉर्खियाला संघात संधी मिळाली तर नवल वाटायला नको.

सलग चार सामन्यांत विजय मिळवल्याने सत्राची शानदार सुरुवात केली होती पण हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकांत जडेजाने ३७ धावा काढत बेंगलोरला बॅकफुटवर टाकले होते.मागच्या सामन्यांतील विसरुन बेंगलोरच्या संघ या सामन्यांत दाखल होईल. मागच्या सामन्यांत बेंगलोरचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले.संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल ती विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पाडिकलवर असेल तर गोलंदाजीची मदार असेल ती हर्षल पटेल, काईल जेमिसन, यजुवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजवर असेल. सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत अग्रस्थानी असणारा हर्षल पटेल आपली मागच्या सामन्यांतील कामगिरी लवकरात लवकर विसरुन या सामन्यांत उतरेल.

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्हन स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, अक्षर पटेल, ख्रिस वोक्स/एन्रिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, आवेश खान

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महम्मद अझरुद्दिन, डॅनियल ख्रिश्चियन/डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, काईल जेमिसन

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: