सनरायझर्स हैद्राबाद रोखणार का चेन्नई सुपर किंगचा विजयी रथ?

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यांत विजय मिळवला आहे महत्त्वाचे म्हणजे मागच्या सामन्यांत चेन्नईने अग्रस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तब्बल ६९ धावांनी पराभव केला होता.दुसरीकडे मागील ५ सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादला फक्त एक विजय मिळवण्यात यश आले आहे. हैद्राबादसाठी यापुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे त्यामुळे हैद्राबाद संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.हा दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरील या सत्रातील पहिलाच सामना आहे.

चेन्नई संघाचा विचार करता संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत समतोल दिसत आहेत.रविंद्र जडेजा, सॅम करन, मोईन अली आणि ड्वेन ब्राव्हो सारख्या अष्टपैलु खेळाडुंचा संघात भरणा असल्याने संघ आणखीन मजबुत दिसत आहे.संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती चांगल्या लयीत असणाऱ्या फाफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडु आणि महेंद्रसिंग धोनीवर तर गोलंदाजीची धुरा असेल ती दिपक चहर, शार्दुल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहिरवर असेल. बेंगलोरविरुद्धच्या सामन्यांत रविंद्र जडेजाने केलेल्या अष्टपैलु कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही.

हैद्राबादसाठी संघाची मधली फळी संघाच्या पराभवाचे कारण ठरली आहे. केन विल्यामसनच्या संघात येण्याने हैद्राबादची फलंदाजीत ताकद वाढली आहे.परंतु कर्णधार वॉर्नर, बेअरस्टो आणि विल्यमसनला भारतीय फलंदाजांकडुन चांगल्या साथीची अपेक्षा असेल.सुरुवातीच्या सामन्यांत मनिष पांडेने चांगल्या खेळी केल्या होत्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता त्यामुळे मागील काही सामन्यांत त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे. विल्यमसनला मनिष पांडेची साथ मिळाली तर ती संघासाठी महत्त्वाची असेल.अष्टपैलु विजय शंकरला देखिल आपले योगदान द्यावे लागेल.गोलंदाजीची धुरा राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि संदिप शर्माच्या खांद्यावर असेल. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैद्राबादचा चेन्नईचा विजयी रथ रोखतो का हे पाहावे लागेल.

चेन्नई सुपर किंग्स – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस, मोईन अली, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, ड्वेन ब्राव्हो

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा/प्रियम गर्ग, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, सिद्धार्थ कौल, जगदिश सुचित

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: