सनरायझर्स हैद्राबाद रोखणार का चेन्नई सुपर किंगचा विजयी रथ?

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यांत विजय मिळवला आहे महत्त्वाचे म्हणजे मागच्या सामन्यांत चेन्नईने अग्रस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तब्बल ६९ धावांनी पराभव केला होता.दुसरीकडे मागील ५ सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादला फक्त एक विजय मिळवण्यात यश आले आहे. हैद्राबादसाठी यापुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे त्यामुळे हैद्राबाद संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.हा दिल्लीच्या अरुण जेटली... Continue Reading →

युवा रिषभ पंतसमोर विराट कोहलीचे आव्हान

पहिल्या ५ सामन्यांत प्रत्येकी ४ विजयांसह दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे संघ ८ गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तीसऱ्या क्रमांकावर आहेत.दिल्लीचा संघ सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवून या सामन्यांत उतरणार आहे तर दुसरीकडे बेंगलोरला सलग चार विजयानंतर चेन्नईविरुद्ध ६९ धावांनी पराभव स्विकारावा लागला त्यामुळे दिल्लीचा संघ आपली विजय लय कायम ठेवण्यास उत्सुक... Continue Reading →

मॉर्गन आणि सॅमसनमध्ये कोण ठरणार वरचढ?

गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर असलेले कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आज मुंबईत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी चार सामन्यांत फक्त एका सामन्यांत विजय मिळवता आला आहे. हा दोन्ही संघांचा मुंबईमधील शेवटचा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकुन मुंबईतल्या सत्राचा शेवट गोड करण्यास उत्सुक असतील. दोन्ही संघ आपल्या मधल्या फळीच्या खराब... Continue Reading →

राहुल आणि गेलच्या शानदार भागिदारीच्या बळावर पंजाबचा मुंबईवर ९ गडी राखुन विजय

एकीकडे मुंबईचा संघ दिल्लीविरुद्ध पराभव स्विकारुन मैदानात उतरला होता दुसरीकडे पहिल्या सामन्यांत विजय मिळवल्यानंतर सलग ३ सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक होता.चेन्नईची खेळपट्टीवर फलंदाजांचा कस नक्कीच लागणार होता. पंजाबचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने संघात एकमेव बदल करत मुर्गन अश्विनच्या जागी रवि बिश्नोईला... Continue Reading →

मुंबई इंडियन्स समोर राहुलच्या पंजाब किंग्सचे आव्हान

पहिल्या सामन्यांत राजस्थानविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर पंजाबला सलग तीन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे तर दुसरीकडे मुंबईला सलग दोन विजय मिळवल्यानंतर दिल्ली विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसतील. मुंबईची मधली फळी संघासाठी पराभवाचे मुख्य कारण ठरत आहे. दोन सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय मिळवले आहेत तर... Continue Reading →

पडिकल आणि कोहलीच्या भागिदारीच्या बळावर बेंगलोरचा विजयाचा चौकार, शतकवीर पाडिकल ठरला सामनावीर

पहिल्या तीन सामन्यांत फक्ता एक विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान होते ते गुणातालिकेत दुसऱ्या आणि आयपीएल २०२१ मधील एकमेव अपराजित संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे. राजस्थानसाठी सामना सोपा नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ बेंगलोरचा विजयी रथ रोखतो का याकडे सर्वांते लक्ष्य होते. राजस्थानसमोर फॉर्म मध्ये असलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डीव्हिलियर्सचे आव्हान होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा... Continue Reading →

पंजाबचा संघ विजयी पथावर परतणार की हैद्राबाद साजरा करणार आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय?

गुणतालिकेत शेवटच्या दोन क्रमांकावर असलेले पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करणारा हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर सलग दोन सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. मागील काही सत्रात पंजाबची गोलंदाजी कमजोरी राहीली आहे.... Continue Reading →

दिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखुन विजय, २४ धावांत ४ गडी बाद करणारा अमित मिश्रा ठरला सामनावीर

आयपीएल २०२० चा विजेता मुंबई आणि उपविजेता दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ मध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी पहिल्या तीन सामन्यांत प्रत्येकी दोन विजय मिळवल्यामुळे हा सामना जबरदस्त होणार यात शंका नव्हती. मुंबईचा संघ आपला चौथा सामना चेन्नई मध्ये खेळत असल्याने सामन्यांवर मुंबईचे वर्चस्व असेल असे वाटत होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल... Continue Reading →

आयपीएल २०२० चा विजेता मुंबई समोर उपविजेता दिल्लीचे आव्हान

आयपीएल २०२० चा विजेता मुंबईचा संघ आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२१ मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तीन सामन्यांत प्रत्येकी दोन सामने जिंकत दिल्ली आणि मुंबईचे दोन्ही संघ लयीत दिसत आहेत. एकीकडे दिल्लीने आपले दोन्ही सामने फलंदाजीच्या बळावर तर मुंबईने गोलंदाजीच्या बळावर जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीने आपले पहिले तीन सामने मुंबईच्या वानखेडे... Continue Reading →

मोईन अली आणि रविंद्र जडेजाच्या फिरकी समोर राजस्थानचे लोटांगण, मोईन अली ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सने आपल्या दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत आयपीएल २०२१ मधील गुणांचे खाते उघडले. आता दोन्ही संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार होते. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांनी आपल्या मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता. प्रथम फलंदाजीस... Continue Reading →

अनुभवी चेन्नईचा संघ राजस्थानवर भारी पडेल का?

पहिल्या सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि पंजाबविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर चेन्नई आणि राजस्थानने पंजाब आणि दिल्लीविरुद्ध विजय मिळवत आपले आयपीएल २०२१ मध्ये गुणांचे खाते उघडे होते.त्यामुळे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. आयपीएल २०२० मध्ये चैन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सकडुन दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे राजस्थान चैन्नईविरुद्धची आपली विजयी लय कायम ठेवतो का... Continue Reading →

बेंगलोर विजयाची हॅटट्रिक साधणार की कोलकत्ता विजयी पथावर परतणार?

बेंगलोर व कोलकत्ता संघाने आयपीएल २०२१ च्या सत्राची विजयी सुरुवात केली होती. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर विजय मिळवत बेंगलोरने सलग दुसरा विजय मिळवला होता तर ३० चेंडूत ३१ धावांची आवश्यकता आसताना कोलकत्ता संघाला मुंबई विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. बेंगलोर सत्रातील एकमेव अपराजीत संघ आहे त्यामुळे बेंगलोरचा संघ आपली विजय लय कायम राखण्यास तसेच कोलकत्ताचा... Continue Reading →

गोलंदाजीच्या बळावर मुंबईचा सलग दुसरा विजय, पोलार्ड ठरला सामनावीर

आयपीएल २०२१ च्या पहिल्या दोन सामन्यांत विजयाची संधी असताना दोन्ही सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादने संधी गमावली होती त्यामुळे हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या-वहिल्या विजयाच्या शोधात होता तर कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयाने मुंबई इंडियन्स संघाचा आत्मविश्वास वाढला असेल त्यामुळे सामना रंगतदार होणार यांत शंका नव्हती. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने संघात... Continue Reading →

मुंबई समोर वार्नरच्या सनरायझर्स संघाचे आव्हान

पहिल्या दोन्ही सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायर्झस हैद्राबादचा संघ चांगल्या स्थितीत होता पण त्या स्थितीतुन हैद्राबादला पराभव स्विकारावा लागला होता. मागच्या सामन्यांत तर शहाबाझ अहमदच्या एका षटकाने सामन्याला कलाटणी दिली होती. चेन्नईच्या खेळपट्टीवर जम बसलेल्या खेळाडुने टिकुन राहणे महत्वाचे होते पण नेमका तिथेच हैद्राबादचा संघ मागे राहिला होता. दोन्ही सामन्यांत मनिष पांडेनी चांगल्या खेळी केल्या... Continue Reading →

दिपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखुन विजय

पंजाब किंग्सने आपल्या पहिल्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा अटितटीच्या सामन्यांत पराभव केल्याने पंजाब संघाचा आत्मविश्वास उचांवला होता तर दुसरीकडे दिल्ली कडुन ७ गडी राखुन पराभव झाल्याने चेन्नईचा संघ आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता. दोन्ही संघाचा विचार करता अनुभवात चेन्नईचा संघ काहीसा सरस वाटत होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंगसाठी आपला... Continue Reading →

कोणता किंग ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० मध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या चैन्नई सुपर किंगने आयपीएल २०२१ च्या आपल्या पहिल्या सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स समोर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्या आव्हानाचा दिल्लीने सहज पाठलाग केला होता तर दुसरीकडे अटीतटीच्या सामन्यांत पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवत सत्राची विजयी सुरुवात केली होती.दोन्ही संघाने पहिल्या सामन्यांत मोठी धावसंख्या उभारली होती... Continue Reading →

डेविड मिलर (६२) आणि ख्रिस मॉरिसच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानचा दिल्लीवर ३ गडी राखुन विजय

रिषभ पंतने कर्णधारपदाच्या आपल्या पहिल्याच सामन्यांत चैन्नई सुपर किंगवर विजय मिळवत आयपीएल २०२१ ची विजयी सुरुवात केली होती तर दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन आपल्या शतकी खेळीनंतरही संघाला विजय मिळवुन देऊ शकला नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ आपला आयपीएल २०२१ मधील पहिला-वहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे दिल्लीचा संघ विजयी लय कायम ठेवण्यास आतुर होता.... Continue Reading →

पंत आणि सॅमसन या दोन युवा कर्णधारांमध्ये कोण मारणार बाजी?

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यांत कर्णधार संजु सॅमसनच्या ११९ धावा राजस्थान रॉयल्सला पराभवापासुन वाचवु शकल्या नाहीत पण २२२ धावांचा पाठलाग करताना सॅमसनने केलेली ११९ धावांची खेळी जबरदस्त होती तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने चैन्ईविरुद्ध शिखर धवन (८५) व पृथ्वी शॉ (७२) बळावर य़शस्वि पाठलाग केला होता. आज दिल्ली व राजस्थानचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सामना मुंबईच्या... Continue Reading →

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर बेंगलोरचा हैद्राबादवर ६ धावांनी विजय, ५९ धावा करणारा मॅक्सवेल ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक होता. सनरायझर्स हैद्राबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैद्राबादने संघात दोन बदल करत मोहम्मद नबी व संदिप शर्माच्या जागी जेसन होल्डर व शाहबाझ नदिमला तर... Continue Reading →

बेंगलोरचा संघ विजयी लय कायम ठेवणार की सनरायझर्स हैद्राबादचा संघ सत्रातला पहिला विजय साजरा करेल?

पहिल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सत्राची विजयी सुरुवात केली होती.तर दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबादला कोलकत्त्या विरुद्ध १० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. चैन्नईत झालेल्या शेवटच्या... Continue Reading →

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: