कोणाला मिळणार टी-२० विश्वचषकाचे तिकीट?

क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या टी-२० विश्वचषकाची १७ ऑक्टोबर २०२१ ला सुरुवात होणार आहे. यात मुख्य फेरी २३ ऑक्टोबर पासुन खेळविण्यात येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा ६ आठवड्यांवर आली आहे त्यात स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर आहे. न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन मोठ्या संघांनी आपला संघ देखिल जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ जाहीर केला जाऊ शकतो.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांपुर्वीच भारतीय संघाची घोषणा होणार त्यामुळे कोणाला विश्वचषकाचे तिकट मिळते याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, रिषभ पंत, रविंद्र जडेजा आणि के एल राहुलचे संघातील स्थान निश्चित आहे. आयपीएलच्या मागील तीन सत्रात, मायदेशात इंग्लंडविरुद्ध तर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या शानदार कामगिरी केलेल्या सुर्यकुमार यादवचे संघातील स्थान देखिल जवळपास निश्चित आहे.

दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसोबतच आयपीएल मधुन देखिल माघार घेतली आहे त्यामुळे त्याची जागा कोण घेणार हे पाहावे लागेल. यासाठी वरुन चक्रवर्ती, राहुल चहर सारखे पर्याय उपल्बध आहेत परंतु यजुवेंद्र चहलच्या रुपाने लेग स्पिनर संघात असल्याने चहरपेक्षा वरुन चक्रवर्तीचेच पारडे जड वाटते. मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर देखिल तंदरुस्त झाला आहे आणि तो देखिल पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. अय्यरसोबतच या जागेसाठी इशान किशन, मनीष पांडे उपलब्ध आहेत परंतु अनुभव आणि कामगिरी पाहता अय्यर काहीसा वरचढ ठरु शकतो.

गोलंदाजीचा विचार करता भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांसारख्या अनुभवी गोलंदाजांसोबत दिपक चहर आणि टी नटराजनला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात पॉवर प्ले सोबतच शेवटच्या षटकांत भारतीय संघाची गोलंदाजी मजबुत राहिल. तर फिरकी गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल आणि वरुन चक्रवर्तीवर असेल. २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेतेपदानंतर भारतीय संघाला आयसीसी चषकावर आपले नाव कोरता आलेले नाही. त्यात ३ वेळेस भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे तर ३ वेळेस भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला आहे त्यामुळे यावेळे भारतीय संघ आयसीसी चषकाचा दुष्काळ संपावण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरताना दिसेल यात शंका नाही.

संभावित संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, दिपक चहर, यजुवेंद्र चहल, वरुन चक्रवर्ती, टी नटराजन

शंतनु कुलकर्णी

Leave a comment

Website Powered by WordPress.com.

Up ↑