टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या टी-२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबर पासुन ओमान मध्ये होणार आहे. स्पर्धेची मुख्य फेरी २३ ऑक्टोबर पासुन सुरु होणार आहे तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा यापुर्वीच केली आहे. आता विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा देखिल करण्यात केली आहे. निवड करण्यात आलेल्या संघात ६ फलंदाज, ७ गोलंदाज तर २ अष्टपैलु खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे तर श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दिपक चहर या खेळाडुंची राखीव खेळाडु म्हणुन निवड करण्यात आली आहे. यासोबतच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मार्गदर्शक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.  

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल, सुर्यकुमार यादव, इशान किशन आणि रिषभ पंतवर असेल तर गोलंदाजीची मदार असेल ती मुख्यत्वे जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन. यासोबतच राहुल चहर, अक्षर पटेल आणि वरुन चक्रवर्ती हे त्रिकुट देखिल फलंदाजांची फिरकी घेण्यात तरबेज आहेत. असेल. अष्टपैलु खेळाडु हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजाच्या समावेशामुळे संघ मजबुत दिसतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविचंद्रन अश्विन २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता त्यानंतर पहिल्यांदाच अश्विनला टी-२० संघात स्थान मिळाले आहे त्यामुळे त्याच्या आयपीएल मधील कामगिरीवर देखिल सर्वांची नजर असेल यात शंका नाही.

भारतीय संघाचा समावेश गट २ मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघासोबत पाकिस्तान, न्युझिलंड, अफगानिस्तान, गट ब १ आणि गट अ २ या संघाचा समावेश आहे. भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२१ मधील आपला पहिला सामना पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर २०२१ रोजी खेळणार आहे. विश्वचषक इतिहासात (५०-५० विश्वचषक, टी-२० विश्वचषक) भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध १२ सामने खेळला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल यात शंका नाही.

संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सुर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,

राखीव खेळाडु – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दिपक चहर

शंतनु कुलकर्णी

Leave a comment

Website Powered by WordPress.com.

Up ↑